आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू विक्रेत्यांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलिस स्टेशनअंतर्गत गावांमध्ये दारू जप्त करण्यात आली.)
देवरी- अवैध धंद्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ३,९५० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पुंडा येथे आरोपी डिगांबर प्रभाकर मालवे यांच्या घरून २४ देशी दारूच्या बाटल्या किंमत १,२०० रुपये, तर कुटासा येथे गजानन राजाराम डोंगरे यांच्याकडे ५५ देशी दारूच्या बाटल्या किंमत २,७५० रुपये, असा एकूण ३,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी ६५ नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार भाऊराव घुगे, विजय सावदेकर, दयाराम राठोड, राजेश हिंगणे, दिलीप इंगळे, प्रमोद मोहनकर, रामेश्वर राऊत यांनी केली.
अवैध धंद्यांची माहिती द्या
दहीहांडा पोलिस स्टेशनअंतर्गत गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंदेवाइकांची गय केल्या जाणार नाही. नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती द्यावी. ठिकाणांची माहिती मिळाल्यास कारवाई करू. भाऊरावघुगे, ठाणेदार, दहीहांडा पोलिस स्टेशन.