आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने शहरामध्ये 46 जड वाहनांवर कारवाई, वाहतूक शाखेचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जुने शहरातील रस्त्यावर अवैध उभ्या असलेल्या ४६ जड वाहनांवर वाहतूक शाखेने शुक्रवारी कारवाई केली. एकूण जवळपास ८९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात अाला. 
किल्ला चाैक ते बाळापूर नाका या दरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर तर काही चालक रस्त्याच्या बाजूला जड वाहने उभी करतात. या वाहनांमध्ये ट्रक इंधनाची वाहतूक करणाऱ्या टंॅकरचा समावेश असताे. या वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी हाेते. परिणामी वाहन चालकामंध्ये वाद हाेऊन त्याचे पर्यावसान हाणमारीत हाेते. काही वेळा तर कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण हाेताे. अशीच काहीशी घटना बाळापूर नाका परिसरात मंगळवारी रात्री घडली हाेती. एका माल मोटारीची दुचाकीस्वारास धडक लागल्यानंतर दाेन गटात दगडफेक झाली हाेती. दरम्यान, १५ सप्टेंबर राेजी वाहतूक शाखेने रस्त्यावर उभ्या असलेल्या जड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. ही माेहिम वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील, प्रकाश तायडे, चंद्रकांत काटाेले, पद्मसिंग ठाकूर, उमेश इंगळे, मुजफ्फर यांनी केली. 
 
या ठिकाणी राबवली पाेलिसांनी माेहिम 
वाहतूक शाखेने वाशिम बायपास, हरिहर पेठ परिसर, किल्ला चाैक ते भांडपुरा चाैक, बाळापूर नाका परिसर, डाबकी रेल्वे गेटकडे जाणाऱ्या मार्गावर नियमांचे पालन करणाऱ्या जड वाहनचालकांविरुद्ध कारवाईची माेहिम राबवली. किल्ला चाैक ते बाळापूर नाक्यापर्यंत अाणि हरिहर पेठ परिसरात शाळा अाहेत. यातून जड वाहनांची वाहतूक धाेकादायक अाहे. त्यामुळे या परिरसात जड वाहनांची वाहतूक हाेऊ नये, यासाठी लाेखंडी खांब उभारण्याची मागणी नागरिकांमधून हाेत अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...