आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांवर कारवाई; साडेनऊ लाख केले जमा, पाेलिसांच्या वतीने मे ते जूनपर्यंत राबवली हाेती माेहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महिन्यात जिल्हाभरातील आठ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी साडेनऊ लाख रुपयांचा महसूल दंडाच्या रूपातून शासनदप्तरी जमा केला आहे. मे ते जूनपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली.
बेशिस्त वाहतुकीबाबत पोलिसांच्या डोक्यावर खापर फोडल्या जाते. मात्र, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारे, विविध वाहनांची तपासणी केली असता वाहनचालक वाहनमालकांकडे वाहनांचे कागदपत्र अपूर्ण असणे, विना परवाना प्रवासी वाहतूक करणे, लायसन्स नसणे जवळ बाळगणे अशा विविध कारणास्तव मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण आठ हजार वाहनांच्या चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून नऊ लाख ५१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करून शासन जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची वाहनांचे परवाने निलंबित जप्त करून संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्यात आली आहेत. सदर वाहनचालकांकडून त्यांचेकडे परिवहन विभागाकडून दंडाची वसुली होईपर्यंत वाहने थांबवून ठेवली आहेत.
आरटीओला पोलिस भारी : आरटीओविभागाच्या कारवायांपेक्षा जिल्हा पोलिसांनी अवैध वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. बंदोबस्त, कायदा सुरक्षा सांभाळून पोलिसांनी केलेल्या कारवायांचे आरटीओ विभागानेही अभिनंदन केले आहे.

नागरिकांत बेशिस्तीचे प्रमाण वाढले : एकामहिन्यात आठ हजार वाहनधारक बेशिस्तीने वागत असल्याचे समोर आले आहे. अशा वाहनधारकांवर कारवाई केल्यामुळे काही प्रमाणात का होईना बेशिस्त वाहनधारकांना धडा मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ऑटोचालकसर्वाधिक बेशिस्त : सर्वाधिकबेशिस्तीचे दर्शन ऑटोचालकांकडून मिळते. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, पोशाख परिधान करणाऱ्यांमध्ये ऑटोचालक आघाडीवर आहेत. शहरात सर्वाधिक कारवाया ऑटोचालकांवर झालेल्या पोलिस रेकॉर्डवरून दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...