आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

388 खासगी बसेस धावणार, एसटीच्या संपावर जिल्हा प्रशासनाचा ‘अॅक्शन प्लॅन’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गैरसोयीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, या आराखड्या अंतर्गत शाळा,काॅन्व्हेंटच्या २३३ तर खासगी वाहतूक करणाऱ्या दीडशे बसगाड्या अशा एकूण ३८८ बसेस राज्य परिवहन महामंडळाच्या मार्गावर धावणार अाहेत. संपाच्या पृष्ठभूमीवर बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 
 
महाराष्ट्र राज्य एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी १७ ऑक्टोबरपासून पुकारलेल्या कामबंद आदोलनांमुळे परिवहन सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. यापृष्ठभूमीवर बुधवारी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे विविध कलमांन्वये कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या आपत्कालिन स्थिती हाताळण्याबाबत अनुषंगिक बाबीचे पूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली. 
 
अशा अाहेत उपाय याेजना: एसटीकर्मचाऱ्यांच्या संपकाळात पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 

१) जिल्ह्यातील शाळा ,काॅन्व्हेंटच्या स्कूल बसेस २३३ ,खासगी वाहतूक बसेस १५० , महानगरपालिकेच्या पैकी वाहतुकीयोग्य बसेस प्रवाशांच्या वाहतुकीकरीता वापरणार. 
२) सदर बसेसचे चालक-वाहकांना राज्य परिवहन महामंडळाच्या मार्गावर तसेच एस.टी. च्या भाडेदराने प्रवाशी वाहतूक करण्याची तसेच आगार परिसर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
३) संपकाळात विविध यंत्रणांकडून उपलब्ध हाेणाऱ्या बसेस एस.टी. भाडेदरापेक्षा अतिरीक्त भाडे घेता येणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार अाहे. 
४) रेल्वे स्थानकावर वाढलेली प्रवाशी संख्या विचारात घेता जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर आणि बसस्थानकामध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार अाहे. 

समिती गठित: संपकाळात प्रवाशी वाहतूक सुरळीत चालु ठेवण्‍यासाठी समितीचे गठन करण्यात अाले अाहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...