आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोरिक्षांवर होते कारवाई; अवजड वाहनांना मात्र अभय, कारागृहाला अवैध वाहनांचा विळखा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरवाहतूक पोलिसांनी शनिवारी पुन्हा एकदा मोटार वाहन कायद्याची पायमल्ली करणाऱ्या १२२ ऑटोरिक्षा चालकांना दंडित केले. मात्र दुसरीकडे रस्त्यावर उभ्या जड वाहनांकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे प्रतिबंधित असलेल्या कारागृहाच्या क्षेत्रात रस्त्याच्या कडेला दररोजच काळी पिवळी ट्रक उभे राहून कारागृह सुरक्षेला आव्हान देत आहेत. 

शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. या कारवाईचे स्वागत होत असताना दुसरीकडे अवजड वाहनांच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचे दिसून येत आहे. ऑटोरिक्षांवर कारवाई हाच एकमेव अजेंडा पोलिसांच्या समोर असल्याने अनेक चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. कारागृहाचा परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. मात्र कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच अवैध वाहने राजरोसपणे उभी असतात. तसेच गॅरेज, काळी पिवळी ट्रक नेहमीच उभे असतात. काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी कारागृहालगतचे अतिक्रमण हटवले होते. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याने याकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय आहे. 

दुचाकीवर कारवाई, चारचाकीला सूट 
शहर वाहतूक शाखेच्या वतीने दुचाकी चालकांवर कारवाईसाठी टोईंग पथक आहे. हे टोईंग पथक शहरातील बासम स्टॅण्ड चौकाकडे फिरकत नाही. येथे असलेल्या बड्या शोरूम समोर अवैधपणे रस्त्यावर वाहने उभी असल्याने वाहतुकीचा येथे नेहमीच खोळंबा होत आहे.त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची शहरात चर्चा आहे. 
 
विशिष्ट दिवशीच ऑटोरिक्षां वर कारवाई 
शहरात विनापरवाना ऑटोरिक्षा धारकांची संख्या मोठी आहे. त्यांचा अंदाज आजपर्यंत पोलिसांना बांधता आला नाही. अशा ऑटोरिक्षांवर नियमित कारवाईऐवजी विशिष्ट दिवशी मोहीम राबवण्यात येते. यात सातत्य नसल्यानेे ज्या दिवशी मोहीम असेल, त्या दिवशी अनेक ऑटोरिक्षा चालक घरी थांबतात दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रवासी वाहतूक सुरु असते. 
बातम्या आणखी आहेत...