आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली येथील अद्ययावत अभ्यासिकेची प्रतिकृती अकोल्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शैक्षणिक हब म्हणून वेगाने विकसीत होणाऱ्या अकोला महानगरात अद्ययावत अभ्यासिकेची आवश्यकता होती. अक्षरा-स्मार्ट अभ्यासिका या स्टडी लायब्ररीमुळे ती पूर्ण झाली आहे. दिल्लीच्या ज्या अभ्यासिकेतून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, वाशीमच्या पोलिस अधीक्षिका मोक्षदा पाटील यशस्वी झाल्या. त्या दिल्लीस्थित युनिक अॅकॅडमीची अक्षरा-स्मार्ट अभ्यासिका प्रतिकृती आहे. अभ्यासिकेचे लोकार्पण सोहळा २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते झाले. हा योगायोग म्हणावा लागेल. 
 
स्पर्धेच्या युगात पाल्यांना स्पर्धेत टिकवायचे असेल तर शिक्षणासारखे शस्त्र नाही. मात्र, आरोग्य आणि शिक्षणासारखी क्षेत्रं कसायांच्या हातात गेली असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे. सर्वसामान्यांना तर आपली संपूर्ण कमाई पाल्यांच्या शिक्षणावर आेतावी लागते. ही गुंतवणूक ठरण्याची काहीही शाश्वती नाही. 
 
अशा परिस्थितीत गोरगरीब, सामान्यांनी कुठे जावे ? ही मोठी सामाजिक समस्या सर्वांपुढे आहे. गळ्यात पडून रडावे असे गळे आणि डोके ठेवावे असे पाय कुठेच दिसत नाहीत. मात्र वाळवंटात आेएसिस असावे असे सामाजिक ऋणाचे भान जाण असलेले जाणते लोक सुदैवाने आहेत. अक्षरा स्मार्ट अभ्यासिकेचे संचालक पंकज पाटील भिलकर आणि उत्कर्ष कोचिंगचे हर्षल देशपांडे यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी दोन कोटी रुपयांच्या विशाल वास्तूत अंदाजे ३० ते ३५ लाख रुपये लावून ना नफा ना तोटा तत्त्वावर अत्याधुनिक, सर्व सुखसुविधांनी युक्त अभ्यासिका उभी केली आहे. अक्षरा स्मार्ट अभ्यासिकेने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा विचार केल्याने संचालकद्वय अभिनंदनास पात्र आहेत. 
 
विशेष म्हणजे, अभ्यासिका निर्मिती मागील पार्श्वभूमी तशीच आहे. ती जशी प्रेरणा देणारी तसेच सामाजिक चिंतनाचाही विषय आहे. या अभ्यासिकेचे संचालक पंकज पाटील भिलकर ज्या आदिवासी आश्रमशाळेत कार्यरत आहेत. त्या शाळेतील पाचवीचे दोन विद्यार्थी विजय शिंदे, अंकुश पवार सामाजिक न्याय विभागाच्या स्पर्धा परीक्षेत २००६-०७ मध्ये राज्यात सहाव्या सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. 
 
विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहता, त्यांचे पुढील शिक्षण आैरंगाबाद येथे सीबीएसई मध्ये व्हावे अशी इच्छा पंकज पाटील यांनी पालकांकडे केली. परंतु पालकांनी या बाबत असमर्थता व्यक्त केल्यानंतर त्यांनी दोघांना आैरंगाबाद येथे जाऊन शाळेत दाखल केले. २००६-०७ पासून या दोन्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च पंकज पाटील स्वत: करत आहेत. 
 
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षात दाेन्ही विद्यार्थ्यांनी आैरंगाबादच्या एका अभ्यासिकेत दाखल करावे, अशी विनंती केली. महिन्याकाठी १३०० रुपये फी होती. पंकज पाटील यांनी दोघांनाही तेथील अभ्यासिकेत दाखल केले. सामान्य तरीही असामान्य अशा घटनेने पंकज पाटील यांच्या विचारविश्वाला एका वळणावर आणून उभे केले. त्यांनी स्वत:ही आपले इन्ट्रॉस्पेक्शन केले. आपण स्वत: अल्पभूधारकाचे पाल्य आहोत. मात्र, गुलाबराव गावंडे यांनी पदरांत घेतल्यामुळे आपण इथवर पोहचू शकलो. सामाजिक ऋण समजून ऋणातून उतराई होण्याची संकल्पना जन्मास आली. 
 
अभ्यासिकेच्या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, सहायक आयुक्त अमोल यावलीकर, युनिकचे संचालक अजरांबर गावंडे, संग्राम गावंडे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमात पंकज पाटील यांची पत्नी माधुरी पाटील, ईश्वर पाटील, अनिल माहोरे, व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांचेही महत्वाचे योगदान राहिले आहे. 
 
शैक्षणिक श्रीकृष्ण ढोरे, 
अकोला. 
बातम्या आणखी आहेत...