आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 20 Years, University Youth Festival In Khamgaon

खामगावात २० वर्षांनंतर विद्यापीठाचा युवा महोत्सव, बाराशे विद्यार्थी सहभागी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर यादरम्यान आयोजित केलेल्या युवा महोत्सवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील बाराशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा महोत्सव यशस्वीरीत्या करण्यासाठी समित्यांचे गठन केले आहे.
२० वर्षांनंतर खामगावात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे युवा महोत्सव घेण्यात येत आहे. यामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. ज्यांनी विद्यापीठाकडे नोंदणी केली आहे, अशा विद्यार्थ्यांनाच या महोत्सवात सहभागी करून घेतले जाणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी आमदार पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर हे राहणार आहेत. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब बोबडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.