आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तासांच्या प्रयत्नांनंतर माकडाला केले पिंजऱ्यात कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावराजा - गत१५ दिवसांपासून परिसरातील नागरिकांच्या घरात घुसून दहशत निर्माण करणाऱ्या माकडाला बुलडाणा वन विभागाच्या "रेस्क्यू टीम'ने १४ जुलैच्या रात्री कारवाई करून पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले.

स्थानिक देऊळगावराजा हायस्कूलच्या पाठीमागील परिसरात गत १५ दिवसांपासून एका नर जातीच्या माकडाने धुमाकूळ घातला होता. हे माकड कोणत्याही क्षणी घरात बिनधास्त प्रवेश करून घरातील चीज वस्तूंची नासधूस करीत असे. त्यामुळे या माकडाच्या भीतीमुळे परिसरातील महिला लहान मुलांमध्ये दहशत निर्माण झाली होती. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे तक्रारही दिली होती.

दरम्यानच्या काळात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माकडास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारून हे माकड हुलकावणी देत होते. १४ जुलै रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास हे माकड या परिसरातील संदीप कटारे यांच्या घरात घुसले. त्या वेळी कटारे यांनी घाबरून जाता प्रसंगावधान राखले दरवाजाची बाहेरील कडी लावून त्या माकडाला आत कोंडून टाकले. तसेच त्यांनी याबाबत वन विभागाला कळवले. परंतु, देऊळगावराजा येथील वन विभागाच्या कार्यालयाकडे प्रशिक्षित कर्मचारी माकड पकडण्याचा पिंजरा उपलब्ध नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी बुलडाणा येथील उप वनसंरक्षक सी. एम. धारणकर यांच्याकडे मदत मागितली.

त्यानुसार माकड पकडण्याचा लोेखंडी पिंजरा घेऊन "रेस्क्यू टीम'मधील प्रशिक्षित कर्मचारी वन विभागाचे अधिकारी रात्री एक वाजता देऊळगावराजा येथे दाखल झाले. माकडाला शेंगदाण्याचे आमिषही दाखवण्यात आले. त्यानंतर या पथकातील कर्मचाऱ्यांनी तीन खोल्यांपैकी दोन खोल्यांमध्ये हिमतीने प्रवेश करून माकडाला पिंजऱ्याकडे हाकलण्याचा प्रयत्न केला. नंतर घरावरील टिनपत्रे बाजूला सारून माकडाला बांबूच्या साहाय्याने हाकलण्यात आले. शेवटी पहाटे या माकडाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले.

माकडाला जंगलात सोडण्यात येणार
यामाकडाची बुलडाणा येथे नेऊन वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या माकडाला बोथा येथील जंगलात किंवा जळगाव जामोदलगतच्या जंगलात सोडून देण्यात येणार आहे. पी.एम. बुटे वनपाल, बुलडाणा
बातम्या आणखी आहेत...