आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणे दोन वर्षांनंतर दिले जाणार कंत्राटदाराला कामाचे अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पावणेदोन वर्षांच्या खडतर प्रवासानंतर अखेर शहरातील सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. २७ जुलैला आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर संबंधित कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाणार आहेत.

२०१३ मध्ये अतिवृष्टीमुळे शहरातील रस्ते नादुरुस्त झाले होते. महापालिकेने राज्य शासनाकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी मागितला होता. राज्य शासनाने २०१३ मध्ये शहरातील १८ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु, यात मॅचिंग फंडची अट टाकण्यात आली होती. ही अट शिथिल करण्याची मागणी महापालिकेने राज्य शासनाला केली. सर्वांच्या प्रयत्नातून ही अट शिथिल करण्यात आली. त्यानंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. १८ पैकी १२ ररस्त्यांचे डांबरीकरण आणि सहा रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या. मात्र, काँक्रिटीकरणाच्या कामातील विविध अटी शर्तींमुळे काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर काही अटी शर्ती कमी करून पुन्हा निविदा प्रसिद्ध कराव्या लागल्या. अखेर २०१५ मध्ये सातव्यांदा बोलावलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला. मात्र, या निविदा १२.५० टक्के अधिक दराने प्राप्त झाल्या. परिणामी, महासभेच्या मंजुरीमुळे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडले. अखेर काही दिवसांपूर्वी महासभेने काँक्रिटीकरणाच्या कामाला मंजुरी दिली. परंतु, त्यानंतर महासभेच्या मंजूर ठरावामुळे संबंधित कंत्राटदाराला कामाचे आदेश देणे शक्य नव्हते. "दिव्य मराठी'ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर महासभेचा मंजूर ठराव महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर बांधकाम विभागाने उर्वरित कार्यवाही पूर्ण केली. आदेशावर आयुक्त शेटे यांची स्वाक्षरी झाली असून, सोमवारी संबंधित कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाणार आहेत.

या रस्त्यांचे काँक्रिटीकरण
{सिव्हिललाइन चौक ते मुख्य पोस्ट ऑफिस
{टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक
{दुर्गा चौक ते अग्रसेन चौक
{पेट्रोल पंप ते पत्रकार कॉलनी
{अशोक वाटिका ते सरकारी बगिच्या {मोहता मिल ते माळीपुरा चौक

कामाला प्रारंभ हाेईल
कामाच्याआदेशाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला सोमवारी कामाचे आदेश दिले जातील. त्यानंतर लवकरच सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रारंभ होईल.'' अजयगुजर, शहरअभियंता महापालिका
आषाढीच्या मुहूर्तावर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम होणार सुरू