आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा मुलगीच? टोमण्यांमुळे आईनेच मिटवली ‘निशाणी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - समाजातून मिळणाऱ्या टोमण्याला कंटाळून आणि दोन मुलींचे पालनपोषण लग्नाच्या चिंतेमुळेच निशाणीला चुलीत जाळल्याचा गुन्हा तिची आई निकिता वाकोडे यांनी पोलिसांसमोर कबूल केला. दरम्यान, आज निशाणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेच्यावेळी मात्र निकिताच्या आक्रोशाने परिसरही हेलावल्याचे चित्र दिसून आले.
सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गौरखेडा कुंभी येथील बिच्छन नदीच्या पात्रात निशाणी गोकूळ वाकोडे या महिनाभराच्या मुलीचा मृतदेह अर्धवट भाजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच वेळी गोकूळ वाकोडे यांचे मामा प्रल्हाद श्रीरामजी नेतनराव नदीपात्रात गर्दी दिसत असल्यामुळे काय झाले म्हणून पाहण्यासाठी गेले होते. भाजलेल्या अवस्थेतील मुलगी भाचा गोकूळची असल्याचे नेतनराव यांनी ओळखले. याची माहिती त्यांनी गावकऱ्यांना देऊन घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निशाणीचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. अज्ञात आरोपीविरुद्ध खून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

समाजाच्या हिणवण्याने गेला निशाणीचा जीव
महिनाभराच्या निशाणीला कुणी जाळले असावे, असा गंभीर प्रश्न पोलिसांसमोर उभा होता. दरम्यान, आज तपासाला गती दिली असता गावात निशाणीची आई निकिता गोकूळ वाकोडे हिनेच जाळल्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलिसांनी निकिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना दिलेल्या बयाणात निकिता म्हणाली, दुसरीही मुलगी झाल्याने तिला अनेक जण हिणवत होते. त्यातच घरची बिकट आर्थिक स्थिती असल्यामुळे दोन मुलींचे पालनपोषण लग्नाचा खर्च कसा भागणार, याची चिंता होती. दरम्यान, सोमवार, जानेवारीला दुपारी वाजताच्या सुमारास सासू इंधन आणायला बाहेर गेली होती, तर पती गोकूळ लाखनवाडीला गेले होते. घरात केवळ वृद्ध सासरे होते. अशा परिस्थितीत पेटत्या चुलीत निशाणीला टाकले. यात निशाणी अर्धवट पोटापर्यंत जळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर निकिताने निशाणीला नदीपात्रात टाकून दिल्याची कबुली निकिताने दिल्याची माहिती ठाणेदार किरण वानखडे यांनी दिली.

पश्चात्तापदग्ध निकिताचा मन हेलावून सोडणारा आक्रोश
निशाणीचीआज, जानेवारी अचलपूर येथील माळवेशपुरा येथील गोकूळ वाकोडेच्या घरून अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी मात्र निकिताच्या आक्रोशाला पारावार उरला नव्हता. तिच्या मन हादरवून टाकणाऱ्या विलापामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाल्याने निकिताच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. गोकूळ वाकोडे काही दिवसांपासून गौरखेडा कुंभी येथे मामा प्रल्हाद श्रीरामजी नेतनराव यांच्या आश्रयाने गेला होता. तेथे मजुरीचे काम गोकूळ निकिता करत होते.
बातम्या आणखी आहेत...