आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन, टाॅवरच्या मोबदल्यासाठी करण्यात येतोय आक्रोश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावराजा- मागील दीड ते दोन वर्षांपासून टावरचा मोबदला मिळत नसल्याच्या कारणावरून हतबल झालेले असोला जहांगीर येथील शेतकरी शिवानंद मांटे यांनी स्वातंत्र्यदिनी सकाळी पासून आपल्याच शेतातील टावरवर चढून रॉकेलसह, कीटकनाशक औषधी सोबत घेऊन शोले स्टाइल आंदोलन केले.

जानेवारी २०१५ मध्ये असोला जहांगीर येथील शेतकरी शिवानंद माणिकराव मांटे यांच्यासह त्यांच्या भावाच्या शेतात टावर उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत या शेतकऱ्यांना एक रुपयाचाही मोबदला संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराकडून देण्यात आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी वेळोवेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्कही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून उडवा उडवीचे उत्तरे देऊन त्यांना वेठीस धरण्यात आले. या सर्व जाचाला कंटाळून शिवानंद मांटे यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मांटे यांच्या शेतात एक हेक्टर डाळिंब, आंबा मोसंबी या फळ झाडांची लागवड २००८ मध्ये केली आहे. मात्र टावर उभारणीदरम्यान अनेक झाडांचे नुकसान झाले. त्या झाडांचे कृषी विभागाअंतर्गत वय मर्यादा ठरवून त्यांचे मूल्यमापन करावे, तसेच त्यानुसार मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली होती. या वेळी उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार शंकरराव बुटले, ठाणेदार एस. एम. जाधव, नायब तहसीलदार सुनील सावंत, सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, संदीप भागिले, ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी आंदोलनकर्त्यांंची समजूत काढून त्यांना खाली उतरण्यास सांगितले. तिढा सुटला.
बातम्या आणखी आहेत...