आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध आंदोलनाने बुलडाणा शहर दणाणले,लघू व्यावासायिकांचे पुनर्वसनासाठी आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतानाच जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहरात शुक्रवार, ऑगस्टला विविध आंदोलनाचा पाऊस पडल्याने प्रशासकीय वातावरण मात्र थंड पडले हाेतेे.

धनगर समाजबांधवांनी उप वनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. तर लघुव्यावसायिकांनी पुनर्वसनासाठी गळफास ग्रंथालय संघ ग्रंथपाल संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर शंभर मेंढ्यामागे वीस एकर शेती देण्यात यावी, वन जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात यावे, राखीव चराई क्षेत्र देवून मेंढपाळांना चराई पासेस देण्यात याव्या, यासह अन्य मागण्यासाठी विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचच्या वतीने आज आॅगस्ट रोजी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात या मोर्चाची सुरुवात जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, तहसील चौक मार्गे उप वनसंरक्षक अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

यादरम्यान सनई डफ वाजवत मेंढपाळांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा वन संरक्षक कार्यालय परिसरात देण्यात आल्या. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेला मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष जि.प.अमरावतीचे संतोष महात्मे, जिल्हाध्यक्ष धोडीराम हाके, मधुकर बिचकुले,धोडीराम गायेकर, हरी कर्नर, राम शिंगाडे अादींनी मार्गदर्शन केले. या वेळी मेंढपाळ धनगर समाजबांधवांच्या एका शिष्टमंडळाने उप वनसंरक्षक बी.टी. भगत यांना मागण्यांचे निवेदन दिले.

धनगरसमाजाच्या मागण्या : मागीलकाही वर्षांपासून मेंढपाळ धनगर समाजावर वन विभागाकडून अन्याय करण्यात येत आहे. वन परिक्षेत्रात मेंढ्यांना चराई करण्यास मनाई करण्यात येते, एवढेच नव्हे तर मेंढपाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मेंढी व्यवसाय करणे कठीण झाले आहे. वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर शंभर मेंढ्यामागे २० एकर शेती देण्यात यावी, जिल्ह्यातील वनजमिनीवर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण ताबडतोब हटवण्यात यावे, मेंढी चराई धोरणाबाबत स्थापन झालेल्या राज्यस्तरीय समितीचा निर्णय लागेपर्यंत मेंढपाळांवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कार्यवाही करण्यात येवू नये, कोणत्याही वन क्षेत्रामध्ये प्रकल्प होत असल्यास त्या ठिकाणच्या मेंढपाळ धनगरांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावे. या मागण्या पुर्ण करा अन्यथा मेंढपाळांच्या कुटूंबियांना नक्षलवादी बनण्याची परवानगी द्या,असे निवेदनात नमुद केले आहे. निवेदन देताना वारुली येथील दगडू बिचकुले, उत्तम पिसाळ, काशीराम बिचकुले, शांताराम बिचकुले, नंदु कर्नर, सहस्त्रमुळी येथील नाना शिंदे, साहेबराव थोरात, महादेव थोरात, निमखेडचे मीता गोरे, बाळू मोरे, मिठाराम गोरे, मोतीराम नेमाणे, धामणगाव बढेचे जगन कारंडे, सोम कारंडे, उमा कैसकर, शांताराम हाके, इसलवाडीचे शेषराव टेळे, नाना ऐळे, पांडुरंग बोरकर, अंकुश टळे, बाळु कोळपे, जगन वाघमोडे, टाकळीचे पुंडलिक कोळपे, नांद्रे, बंडू पिसाळ, पुंडलिक कोळपे, बाळकृष्ण थोरात, संजय ठोंबरे, नीळकंठ कुराळ,खेर्डाचे गंगाराम कोकरे, नाना कोकरे, सुनगावचे गोमा घुले, पिंगळीचे मोतीराम डोमाळे, हनुमंत डोमाळे, लाखनवाडा, नाना मार्कड, खंडू हाटकर, गजानन शिंगाडे, शिराळाचे अरुण मार्कड, शैलेश ठोंबरे, साखळीचे देवराव लवंगे, संतोष सोनुने यांच्यासह महिला पुरुषांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

लघुव्यावसायिकांचे गळफास आंदोलन : शहरातीललघु व्यावसायिकांनी आपला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याने उपासमारीची वेळ आली अाहे. त्यामुळे इच्छा मरणाची परवानगी द्या, अशा मागणी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात नमुद केले आहे की, गेल्या अाठ ते दहा महिन्यांपासून बुलडाणा शहरातील अतिक्रमण आकस सुड बुद्धीने जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर उपासमारीची वेळ आली असून,अनेकवेळा निवेदन लेखी तोंडी निवेदने प्रशासनाकडे सादर करुनही ठोस कार्यवाही झाली नाही.

तर नगर पालिकेने अतिक्रमणधारकांना खोटे आश्वासन दिले. बुलडाणा शहरात कोणत्याही प्रकारचे उद्योग धंदे नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांना शासनाने इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी किसन पैठणकर, प्रशांत गायकवाड, अब्दुल रहीम शेख बिराम या आंदोलकांनी केली.

या वेळी अतिक्रमणधारकांनी केलेल्या धरणे आंदोलनात अभय सोनुने, अतुल नारडिया, शेख लुकमान, राजुसिंग पुरोहित, चेतन मुळे, अजय कऱ्हाळे, अनिल डवके, विजय बिल्लारे, सै.जलील मो.फारुक्र हुकुमसिंग राजपुरोहित, शेख लुकमान शेख गफुर, मोे.अशपाक मो.युसुफ, मो.मतीम अब्दुल रशीद, रमेश तळणीकर, अनिल सोनुने, रविंद्र जाधव, गजानन परांडे, रघुनाथ जाधव आदींनी सहभागी झाले होते.

ग्रंथालय संघाचेही धरणे आंदोलन
विविधप्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा ग्रंथालय संघ ग्रंथपाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नेमीनाथ सातपुते, वाघ, निशिकांत ढवळे,पंजाबराव गायकवाड, सातव आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...