आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकाची नियुक्ती; डी. आर. पिंजरकरांनी सूत्रे स्वीकारली, संचालक मंडळ बरखास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदी सहायक निबंधक डी. आर. पिंजरकर यांची नियुक्ती सहकारी संस्था अकोलाचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानदीप लोणारे यांनी एप्रिल रोजी केली. पिंजरकर यांनी आपल्या पदाची सूत्रे बुधवारी स्वीकारली. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपला होता. प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर विद्यमान सत्ताधारी गटाने दुष्काळाचे कारण समोर करून शासनाकडून २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळवली होती. त्यानंतर एप्रिल २०१६ रोजी बाजार समितीस दिलेली मुदतवाढ रद्द करून बाजार समितीची निवडणूक घेण्याची अधिसूचना सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी य. ग. पाटील यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांनी आदेश काढून संचालक मंडळ बरखास्त करून तेल्हारा बाजार समितीच्या प्रशासकपदी मूर्तिजापूरचे सहायक निबंधक डी. आर. पिंजरकर यांची नियुक्ती केली.