आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला होणार वायफाय सिटी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- डिजिटलइंडिया, डिजिटल महाराष्ट्रच्या धर्तीवर आता अकोल्यालाही डिजिटल करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. अकोल्याला वाय-फाय सिटी, सेफ सिटी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली आहे. त्या समितीची बैठक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या दालनात बुधवारी पार पडली.

जिल्ह्यात शासकीय खासगी कंपनीचे नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच अकोला शहरात ४-जी कनेक्टिव्हिटी करण्यासाठी कार्यवाही चालू आहे. यानंतर संपूर्ण शहर वाय-फाय केले जाणार आहे. सर्व जि.प. शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

समितीगठित : जिल्ह्यातशासकीय खासगी कंपनीचे नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याबाबत येत असलेल्या अडचणींबाबत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, महापालिकेचे आयुक्त अजय लहाने, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता मजीप्रा, मनपा शहर अभियंता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महाप्रबंधक भारत संचार निगम, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी तसेच जीओ इन्फोटेक प्रा. लि.चे समन्वय अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

नेट कनेक्टिव्हिटी नसल्यास तक्रार करा
शासकीयखासगी कंपनीचे नेट कनेक्टिव्हिटीसंदर्भात कोणाची तक्रार असल्यास लेखी स्वरूपात देण्यात यावी. निश्चित संबंधित कंपनीला सूचित करून कार्यवाही केली जाईल.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी.