आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 संशयितांची आेळखपरेड, बलात्काऱ्यांना केली अटक; आरोपी वाढण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- टिळक रोडवरील त्रिवेणी कॉम्पलेक्समध्ये नराधमांनी १० वर्षीय चिमुकलीवर रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सामूहिक बलात्कार केला होता. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत ५५ संशयितांची आेळखपरेड घेतली. सुरुवातीला दोघांना अटकही केली होती. मात्र, बलात्कार करणारे मुख्य दोन आरोपी वेगळेच असल्याचे मंगळवारी समोर आले. विशेष म्हणजे दोन्ही नराधमांना पकडण्यात रामदासपेठ पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. मंगळवारी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांनी बलात्कार केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांचे स्वतंत्र तपास पथकच गठित केले होते. त्यानुसार रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश सावकार यांच्या मार्गदर्शनात डीबीस्कॉडने २५ ते ३० संशयितांची आेळखपरेड केली, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या पथकाने २५ ते ३० संशयितांची ओळखपरेड केली. रविवारी पोलिसांनी मध्यरात्री प्रवीण प्रकाश चव्हाण ५७ वर्षीय गोविंद परशराम साखरे या दोघांना संशयावरून अटक केली होती. त्यापैकी प्रवीण पोलिस कोठडीत आहे, तर गोविंद साखरे हा न्यायालयीन कोठडीत आहे. 

टिळक रोडवर असलेल्या सर्वच दुकानांची, सुभाष चौक मच्छी मार्केट ताजनापेठमधील घरांची झडती घेऊन आरोपीचे स्केच दाखवले. त्यानंतर पोलिसांनी सुभाष चौकातील मच्छीमार्केटमध्ये राहणारा शेख मुश्तकीम कुरेशी अब्दुल जाकीर कुरेशी (वय १९) ताजनापेठेतील कागजीपुऱ्यात राहणारा माेहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी (वय २०) या दोघांना अटक केली. त्यांची सखोल चौकशी केली असता दोघांनाही केलेल्या कुकर्माचा घटनाक्रमच सांगितला बलात्कार केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे याआधीच अटकेत असलेला गोविंद साखरे याचा मात्र या घटनेत संबंध असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली. पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते. 

प्रवीणला आरोपातून वगळणार 
प्रवीण चव्हाणचा प्रकरणात दाेष नसल्याचे सिद्ध झाले आहे. या गंभीर आरोपातून प्रवीण चव्हाण याला दोषमुक्त करू, चौकशी भाग असल्याने त्याला गैर कायदेशीर रित्या ताब्यात ठेवता त्याची कायदेशीर अटक केली होती, असे सांगितले. 

अॅट्रासिटीचे कलम लावले, तपास डीवायएसपींकडे 
पीडित चिमुकली मागासवर्गीय घटकातील असल्याने मंगळवारी रामदासपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध अॅट्रासिटीचे कलम लावले आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक मिणा म्हणाले. 

संशयित मुख्य आरोपींचे चेहरे मिळते जुळते 
घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली लगेच प्रवीण प्रकाश चव्हाण याला अटक केली. पीडित मुलीनेही हाच आरोपी असल्याचे घाबरलेल्या अवस्थेत सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली हाेते. आता पोलिसांनी शेख मुश्तकीम कुरेशी प्रवीण चव्हाण याचा चेहरा मिळता जुळता असल्याचे दिसून आले.
 
तपास मुळाशी; प्रवीण बचावला 
सुरुवातीला दोन आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास थांबवला असता तर कदाचित आधीच पकडलेला आरोपी प्रवीण प्रकाश चव्हाण याचा नाहक बळी गेला असता. मात्र, पोलिसांनी तपास सुरुच ठेवला. रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार यांनी आरोपीचे स्केच घराघरात दुकांनादुकानात दाखवले खरे आरोपी शोधून काढले. प्रवीण दोषी नसल्याचे सिद्ध झाले. प्रवीणवरील आरोप निरस्त झाले. कदाचित या प्रकरणात त्याचा बळी गेला असता. 

अॅट्रासिटीचे कलम लावले, तपास डीवायएसपींकडे 
पीडितचिमुकली मागासवर्गीय घटकातील असल्याने मंगळवारी रामदासपेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध अॅट्रासिटीचे कलम लावले आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही पोलिस अधीक्षक मिणा म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...