आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील प्रमुख १० चौकांत सिग्नलच्या कामाला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील प्रमुख चौकांत वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल लावण्याचे काम सुरू झाले अाहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘दिव्य मराठी’ने लावून धरला होता. वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी विविध राजकीय पक्ष संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले हाेते. अखेर महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने शहरातील १० प्रमुख चौकांमध्ये सिग्नल उभारण्याचे काम सुरू केले आहे.
शहरात दररोज वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, रस्त्यांमध्ये वाढ होत नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल बनत चालली आहे. या वाहतुकीचे व्यवस्थित नियमन व्हावे, म्हणून पोलिस प्रशासनाने पावले उचलली आहेत. शहरात अशोक वाटिका चौक, बसस्थानकासमोरील चौक आणि टॉवर चौकात सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र, इतर चौकात सिग्नल नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
यापूर्वीच शहरातील प्रमुख चौकांत सिग्नल असावेत, असा प्रश्न लावून धरल्यानंतर पोलिस प्रशासनाने जादा रहदारीच्या चौकांचा आराखडा महापालिका प्रशासनाला दिला. त्यावर महापालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करून, १० चौकांत सिग्नल लावण्यासाठी निविदा काढल्या होत्या आणि त्यानुसार चौकांमध्ये सिग्नल बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख चौकांत सिग्नल लागलेले दिसणार आहेत.
पोलिसांच्याअपुऱ्या मनुष्यबळामुळे सिग्नल यंत्रणा अाहे आवश्यकच
शहरामध्येशंभरपेक्षा जास्त चौक असून, वाहतूक पोलिसांची संख्या मात्र फक्त पन्नासच्या आसपास आहे. या सर्व चौकांमध्ये वाहतूक नियंत्रित करताना त्यांची दमछाक होते. मात्र, आता शहरातील प्रमुख चौकांत सिग्नल लागणार असल्यामुळे पोलिसांचा ताण कमी होणार असून, शहरातील इतर भागात त्यांना लक्ष देता येणार आहे.

६०लाख रुपये खर्च
प्रत्येकचाैकातील सिग्नलवर सहा लाख रुपयांचा खर्च हाेणार अाहे. सिग्नलच्या कामासठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात अाले अाहे.
बस स्थानक
प्रत्येक चौकात सिग्नलसाठी मंजूर
6,00,000
काही दिवसांत प्रमुख चौकांत सिग्नल लागलेले असतील.

अपघाताचे प्रमाण होणार कमी
ज्याचौकांत सिग्नल बसवण्यात येत आहेत, ते जादा रहदारीचे चौक आहेत. या चौकांमध्ये समोरा-समोर वाहने येत असल्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत असतात. त्याप्रमाणे वादही उद््भवतात. सिग्नल सुरू झाल्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जवाहर नगर चौक
नेहरू पार्क चौक
सिव्हिल लाइन्स चौक

डिव्हायडरचे काम सुरू
ज्याचौकांत सिग्नल लावण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी डिव्हायडरसाठी खांब उभारणीच्या निविदांना मंजुरी देण्यात अाल्यामुळे अाता ते कामही सुरू झाले आहे, वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. सिग्नलमध्ये अडथळा ठरणाऱ्या फांद्याही तोडण्यात आल्या आहेत, तर काही चौकांतील काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या चौकांत लागतीलसिग्नल
बसस्थानकाच्याबाजूला असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन चौक, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाइन्स चौक, सिटी कोतवाली चौक, हुतात्मा स्मारक चौक, रतनलाल प्लॉट चौक, वाशीम बायपास चौक, जेल चौक.
शहरातील प्रमुख चाैकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात करण्यात अाली अाहे.
वाशीम बायपास चौक
मोर्णा नदी
मोर्णा नदी
असदगड किल्ला
सिटी कोतवाली चौक
जेल चौक
हुतात्मा स्मारक चौक
रेल्वे स्टेशन चौक
रतनलाल प्लॉट चौक
अग्रसेन चौक
मुख्य पोस्ट ऑफिससमोर