आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Citizen Confusion In Two Different 50's Note

50च्या नोटवरून नागरिकांमध्ये संभ्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नागरिकांमध्ये संभ्रम असलेली हीच ती ५० रुपयांची नोट.)
अकोला- चलनात असलेल्या ५० रुपयांच्या दोन नोटांमध्ये तफावत असल्याने नागरिकांमध्ये नोट बनावट असल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, याविषयी स्टेट बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही नोटा खऱ्या असून, संभ्रम असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.

बाजारात सध्या चलनात असलेल्या ५० रुपयांच्या दोन नोटांमध्ये काही तफावती आढळतात. एका नोटेवर छपाईच्या वर्षाचा उल्लेख आहे, तर दुसरीवर उल्लेख नाही. एका नोटेवर विशिष्ट प्रकारची डिझाइन आहे, तर दुसरीवर नाही. एकावर चांदीची तार स्पष्ट दिसते, तर दुसरीवर दिसत नाही. तसेच नोटवर असलेल्या फुलाच्या डिझाइनमध्येही तफावत आहे. त्यामुळे या दोनपैकी कुठली नोट खरी कुठली बनावट, असा संभ्रम निर्माण झालाे. हा संभ्रम दूर करण्यासाठी पुढाकार घेत स्टेट बँकेच्या अकोला शाखा प्रबंधक एस. टी. बोर्डे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ५० रुपयांच्या दोन्ही नोटा पाहून या दोन्ही खऱ्या असून, कुठलीच बनावट नसल्याचे सांगितले.
तसेच २००५ पूर्वीच्या नोटा बँकेकडे जमा करण्याचे यापूर्वीच आवाहन केले आहे. मात्र, काहींनी नोटा जमा केल्या नाहीत. जुन्या नवीन फॉर्मेटमध्ये काही तफावती असू शकतात. मात्र, दोन्ही नोटा खऱ्या असून, संभ्रम असल्यास बँकेशी संपर्क साधावा.