आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारत माता की जय’, ‘शहिद जवान अमर रहे’च्या निनादात दिला जिल्ह्यातील दाेन्ही शहीदांना निराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेल्यात शहिद अानंद गवई यांच्या अंत्यदर्शनासाठी माेठी गर्दी झाली हाेती. - Divya Marathi
अकाेल्यात शहिद अानंद गवई यांच्या अंत्यदर्शनासाठी माेठी गर्दी झाली हाेती.
अकोला - काश्मीरमधील गुरेचा येथे हिमस्खलन होऊन शहिद झालेल्या अकोला जिल्ह्यातील शहीद आनंद शत्रुघ्न गवई यांच्या पार्थिवावर बुधवारी मोर्णा नदी काठावरील स्मशानभूमित तर शहिद संजय सुरेश खंडारे या जवानाचे पार्थिवावर माना येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. 
 
मंगळवारी रात्री अडीच वाजता वाजताच्या सुमारास लष्कराच्या विशेष गाडीमधून अकोला येथील शहीद आनंद शत्रुघ्न गवई संजय सुरेश खंडारे यांचे पार्थिव अकोला येथे आणण्यात आले. सकाळी वाजेपर्यंत दोघांचेही पार्थिव सर्वोपचार रुग्णालयातील वातानुकुलीत कक्षात शवपेटीत ठेवण्यात आले. त्यानंतर शहीद संजय खंडारे यांचे पार्थिव माना येथे रवाना केले तर शहीद आनंद गवई यांचे पार्थिव वाशीम बायपास येथील पंचशील नगरातील त्यांच्या निवासस्थानी नेले. त्यानंतर शासकीय वाहनांमध्ये मोर्णा नदी काठावरील स्मशानभूमी येथे शहीद आनंद गवई यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. येथे मिलिटरी आणि जिल्हा पोलिस दलातर्फे शोकफायर करून मानवंदना दिली. शहीद आनंद गवई यांच्या पार्थीवाला त्यांचे वीर पिता शत्रुघ्न गवई भाऊ धनंजय यांनी अग्नी दिला. तर माना येथे शहीद संजय खंडारे यांच्या पार्थीवाला त्यांचा एक वर्षाच्या मुलाने आजोबाच्या खांद्यावर बसून अग्नी दिला. 

बहिणींची प्रकृती बिघडली: शहिद आनंद गवई यांना चार बहिणी आहेत. आनंदवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमितच बहिण लता ही बेशुद्ध झाली. त्यानंतर तिघीही बहिणींला दु:ख अनावर झाल्याने त्यांचीही प्रकृती बिघडली त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
तीन शोकफायर 
शहिद जवान आनंद गवई संजय खंडारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडले. यावेळी सुरुवातीला पोलिस दलाने बंदुकीच्या तीन फेरी झाडून शोक सलामी देण्यात आली. त्यानंतर मिलिटरीच्या जवानांनी हवेत तीन फेरी झाडून सलामी दिली. 
 
रस्त्यावर फुलांची चादर अन् डाेळे पाणावलेलेे 
ताेबालपणी गल्लीत खेळला....तेथेच माेठा झाला...देशभक्तीचे धडे गिरवले...सैन्यात गेला...देशाच्या संरक्षणासाठी वीर मरण प्राप्त झाले...हिमकडा कोसळल्याने काश्मीरात शहीद झालेल्या पंचशील नगर राहणारे अानंद शत्रुघ्न गवई यांचा अखेर प्रवासही तेथूनच झाला. अापल्या लाडक्या सुपुत्राला निराेप देताना पंचशील नगर परिसरातील नागरिकांचे डाेळे पाणवले. अानंद राहत असलेल्या परिसरात पार्थिव फिरवण्यात अाले. यासाठी संपूर्ण परिसरातील रस्त्यांवर फुलांची चादरच अंथरण्यात अाली हाेती. ‘अमर रहे अमर रहे’ अानंद गवई अमर रहे, भारत माता कि जय’, अशा घोषणाही देण्यात अाल्या. 

चिमुकल्या अादर्शने दिला पित्याला अग्नी 
मूर्तिजापूर- मानायेथील संजय सुरेशराव खंडारे यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्यावर आज राहत्या गावी माना येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. शहीद संजय यांच्या पार्थिवाला त्यांच्या एक वर्षाचा मुलगा अादर्श यांने अाजाेबांच्या खांद्यावर बसून अग्नी दिला. पोलिस दलातर्फे तीन बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली, तर त्यानंतर सैन्य दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. 
 
असाही धीरोदात्तपणा 
अनेक मान्यवर संजय यांच्या वडिलांचे सांत्वन समजुत काढत असताना संजय यांच्या वडिलांनी संजय शहीद झाल्याने आम्हाला चिंता नसून उलट अभिमान आहे, वीरगती प्राप्त होऊन असा सैनिक आमच्या पोटी जन्माला आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, यावर सुरेशराव खंडारे यांचा धीरोदात्तपणा दिसून अाला. 
 
संजय यांच्या पत्नी बेशुद्ध: पत्नीशीतल यांच्या डोळ्यांना संजय यांचे पार्थिव दिसताच हंबरडा फोडून त्या राडायला लागल्या. त्यांचा आक्रोश उपस्थिस्तांचे हृदय हेलावणारा होता. काळजाचा थरकाप उडवणारा या शोकाकुल वातावरणात त्यांना नातेवाईकांनी कसेबसे सावरले. इतवरही त्या आपल्या भावना आवरू शकल्या नाहीत, स्वतःवरचे त्यांचे नियंत्रण सुटले अन रडत त्या अखेर चिताग्नीनंतर बेशुद्ध झाल्या. 
 
वीर भावाला गणवेशातच दिला खांदा : शहिद अानंद गवई यांचे भाऊ धनंजय हे एमअायडीसी पाेिलस ठाण्यात कार्यरत अाहेत. वीरगती प्राप्त झालेल्या भावाच्या पार्थिवाला धनंजय यांनी पाेिलस गणवेश परिधान करुन खांदा दिला. नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पाेलिसाने देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाची अाहुती दिलेल्या जवानाला खांदा दिला. खांदा देतांना भाऊ धनंजय त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहत हाेते. 
 
 

 

 
बातम्या आणखी आहेत...