आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये लिकेजच लिकेज..; बार्शिटाकळीत पुन्हा पाणीचोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला; तीनते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे, तर दुसरीकडे शहराच्या अनेक भागांत जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकारामुळे नासाडीसह नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था झाली असून, मुख्य जलवाहिनीवरही पाण्याची गळती सुरू अाहे. त्यातच बार्शिटाकळीत पुन्हा पाण्याची सर्रास चोरी सुरू आहे. पाणीपुरवठा विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.
काटेपूर्णा प्रकल्पात २२.७० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. यातून महापालिकेला जुलै २०१६ पर्यंत १४.४९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. पाण्याचा अपव्यय आणि बाष्पीभवन लक्षात घेता, शहरासाठी मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी गळती तसेच पाणीचोरी रोखण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, या प्रकाराकडे लक्ष देता, शहराला तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग अद्यापही सुरूच आहे. या प्रयोगामुळे काही भागांत सलग दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागांत सात ते आठ दिवस पाण्याचा थेंबही मिळत नाही. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले. शहराच्या जवळपास सर्वच भागात पाणीपुरवठ्याच्या दिवशी जलवाहिन्या लिकेज झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.
लिकेज वेळीच दुरुस्त केले जात नाहीत. परिणामी, नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. रामनगर आणि परिसरातच ६० लिकेजेस पाहावयास मिळतात. परंतु, हे लिकेज दुरुस्त करण्याकडे पाणीपुरवठा विभागाचे अद्यापही दुर्लक्ष होत आहे. शहरातील अंतर्गत लिकेजेसकडे दुर्लक्ष झालेले असताना महान ते अकोला या मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरही पाण्याची २४ तास गळती सुरू आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरुस्त तर काही ठिकाणी जलवाहिनी फुटलेली आहे. हे लिकेज दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याने दररोज हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

अन्यथा पाणीटंचाईचे संकट
अंतर्गततसेच मुख्य जलवाहिनीवरील पाणी गळती आणि लिकेजकडे दुर्लक्ष केल्यास पाण्याचा होणारा अपव्यय आणि बाष्पीभवन तसेच पूर्वी दररोज पाच कोटी ७० लाख यानुसार पाण्याची उचल केली जात होती. परंतु आता पाण्याच्या उचलमध्ये वाढ झाली आहे. या सर्व प्रकारामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२४तास पाण्याची उपलब्धता
महानयेथील जलशुद्धीकरण केंद्रातून ६०० मिलिमीटर आणि ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यापैकी ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बार्शिटाकळी शहरातून गेलेली आहे. या मुख्य जलवाहिनीवर शेकडो अवैध नळजोडण्या अनेक वर्षापासून होत्या. या अवैध नळजोडण्या तत्कालीन उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी तोडल्या होत्या. त्यानंतर उपायुक्त माधुरी मडावी यांनीही अवैध नळजोडण्या तोडल्या. परंतु आता पुन्हा अवैध नळजोडण्यांनी डोके वर काढले आहे. मुख्य जलवाहिनीवरून ५०० ते ६०० मीटर अंतरावर अ‌वैध नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे या वेळी सार्वजनिक अवैध नळजोडण्या घेण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही नागरिकाच्या घरात वैध नळजोडणी नाही. रस्त्यालगत जलवाहिनी टाकून त्याला कॉक बसवला आहे. या कॉकला पाइप लावून नागरिक आपल्या घरात थेट पाणी घेतात. विशेष म्हणजे, ही व्यवस्था २४ तास उपलब्ध आहे.

पाण्याची उचल
ऑक्टोबरकोटी २६ लाख
ऑक्टोबर कोटी ६७ लाख
ऑक्टोबर कोटी ७४ लाख
ऑक्टोबर कोटी ८३ लाख
ऑक्टोबर कोटी ६८ लाख

राणीसती मंदिर मार्ग
महान ते अकोला या ३२ किलोमीटरच्या अंतरात लहान-मोठे (व्हॉल्व्हसह) एकूण १६ ठिकाणी लिकेज शहरात शेकडो ठिकाणी अंतर्गत लिकेजेस आहेत
बातम्या आणखी आहेत...