आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यात पोलिसांना येतेय यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - संपूर्ण शहर लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आणण्यासाठी पोलिस प्रशासन सरसावले आहे. शासनाच्या सीसीटीव्ही अनुदानाच्या यादीत जरी शहराचा समावेश नसला, तरी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पोलिस प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्याला यशही आले आहे. आता सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे आणि खदान पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. दिव्य मराठीने याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा रुजू झाल्यापासून त्यांनी पोलिस दलांमध्ये अनेक बदल केले आहेत. तपासाच्या कामात असेल किंवा कोणत्याही कामात जनतेचा सहभाग घेण्याची प्रथा त्यांनी सुुरू केली आहे. जनसेतू ही योजना त्याचाच भाग आहे. पोलिस कल्याणासाठी सर्वाधिक कामे पहिल्यांदाच जिल्ह्यात झाली आहेत. आता त्यांनी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या हद्दीत आणण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार त्यांनी शहरातील पोलिस अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी सर्व ठाणेदारांनी सुरू केली आहे. डाबकी रोड पोलिस ठाण्याची शहरातील संपूर्ण हद्दीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले अाहेत. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे ठाणेदार घन:शाम पाटील यांनी पुढाकार घेत सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याची हद्द सीसीटीव्ही आणण्यासाठी काम सुरू केले आहे. व्यापारी, प्रतिष्ठाने आणि शिकवणी वर्ग संचालकांच्या बैठका घेऊन त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे महत्त्व सांगितले आहे. या परिसरातील प्रतिष्ठितांनी त्यांना सहकार्य केले असून, लवकरच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत, अशी माहिती ठाणेदार घन:शाम पाटील यांनी दिली, तर खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ठाणेदार छगनराव इंगळे यांनी पुढाकार घेतला आहे.

सीसीटीव्हीमुळेटारगटांना बसणार चाप : सिव्हिलपोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक शिकवणी वर्ग चालतात. तिथे जाणाऱ्या मुलींना टारगटांचा त्रास सहन करावा लागतो. तसेच बाहेर गावाहून शिक्षणासाठी आलेल्या मुलांनाही त्रास होतो. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यास टारगटांना चाप बसणार आहे.

^पोलिस ठाण्याच्या हद्दीत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. त्यावर काम सुरू आहे. व्यापारी आणि प्रतिष्ठितांचे सहकार्य मिळत आहे. लोकसहभागातून ही योजना कार्यान्वित होत आहे. गुंडांना पकडण्यात यामुळे यश येणार आहे.'' घन:शाम पाटील, ठाणेदारसिव्हिल लाइन्स
चेनस्नॅचिंग थांबणार

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना नेहमीच या परिसरात घडतात. मंगळसूत्र चोरणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होणार असल्यामुळे चोरांना पकडण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.