आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकाऱ्यांनी घरी अडवला पाण्याचा थेंब अन् थेंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हाधिकारीजी. श्रीकांत यांनी आपल्या शासकीय बंगल्याच्या सुमारे १० एकर परिसरात मिनी पाणलोट मॉडेल तयार केले आहे. शासकीय निवासस्थानी पाणलोट मॉडेलसह तयार केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब अडवण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमाची माहिती देताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि सिंचनासाठी तयार केलेले धरण तसेच तलावातील पाणी हे शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचन करण्यासाठी पाण्याची कमतरता पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादन कमी होते. यासाठी जर शहरवासीयांनी जलस्रोत वाढवला तर पिण्याच्या पाण्यासाठी धरण तलावावर असलेला ताण कमी होईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळेल. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून छतावर पडणारे पाणी आपण जिरवू शकतो, ही कल्पना मनात आली. नागरिकांसमोर एक उदाहरण म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय बंगल्याचे परिसरात हा प्रयोग केला आहे.

जलसंवर्धन करा
^प्रत्येकाने घरात परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करून पाण्याचा जलस्रोत वाढवण्यास सहकार्य करावे. छतावरून पडणारे पावसाचे पाणी तसेच परिसरातील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग (जलसंवर्धन)द्वारे जमिनीत मुरवावे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी अकोला

रेन वॉटर हार्वेस्टिंग : छतावरूनपडणारे पावसाचे पाणी पाइपलाइनद्वारे एकत्र करून बंगल्याच्या मागील भागात बंद अवस्थेत असलेल्या बोअर वेलच्या बाजूला शोषखड्डा खोदून त्या खड्ड्यात फिल्टर मटेरियल वापरून पाणी मुरवले. त्याच्या बाजूला २०० फुटांवर नवीन १०० फूट बोअर करून रिचार्ज शॉफ्ट तयार केला त्यामध्येसुद्धा फिल्टरद्वारे पाणी जिरवले जाते.

सिमेंट नाला बांध
पाण्यामुळे माती तसेच पावसाचे पाणी वाहून जात होते. त्याला जाळीचा बंधारा करन पाणी सिमेंट नाला बांधाने अडवले सिमेंट नाला बांधातून ओव्हरफ्लो होऊन जाणारे पाणी शोषखड्ड्यात मुरवले आहे. बंगल्यासमोरील रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने पावसाचे पाणी हे मुख्य दरवाजाकडे वाहते, तेथे लोखंडी जाळी लावून तेथे सिमेंटच्या नालीद्वारे शोषखड्ड्यामध्ये पाणी जिरवल्या जाते.
बातम्या आणखी आहेत...