आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनासह पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित व्हावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - विकासासहइतरही मुद्यांबाबत केवळ ग्रामसेवकसारख्या प्रशासनातील घटकाला जबाबदार धरता संबंिधत पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी कार्यवाही का हाेत नाही, एखादी स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त का हाेत नाही, असा प्रश्न िवभागीय अायुक्त जे. पी. गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शनिवारी उपस्थित केला. अायुक्तांनी शनिवारी िजल्हा परिषदेच्या कामकाजाचा अाढावा घेतला. त्यानंतर त्यांनी निवडक पत्रकारांशी चर्चा केली.

या वेळी िजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण िवधळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार उपस्थित हाेते. िवभागीय अायुक्त गुप्ता यांच्या अकाेला दाैऱ्याच्या पृष्ठभूमीवर िजल्हा परिषदेत गत दाेन िदवस अाढावा बैठकांचे अायाेजन केले. त्यानंतर २२ ला चौथा शनिवार असतानाही कार्यालय सुरु हाेते. त्यांनी िजल्हाधिकारी कार्यालयातील लाेकशाही सभागृहात अधिकाऱ्यांची अाढावा बैठक घेतली. कुपाेषणाची समस्या मार्गी लागण्यासाठी सीडीपीअाेंच्या िरक्त असलेल्या जागा भरणे अावश्यक असल्याचा मुद्दा बैठकीत पुढे अाला. अायुक्तांनी अार्थिकबाबतचाही अाढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांकडून िवविध याेजनांची सद्यस्थितीही जाणून घेतली. बैठकीत अधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या. या समस्यांचा अभ्यास करुन ठाेस उपाय याेजना करण्यात येणार अाहेत. या वेळी सांगण्यात आले.

सभांमध्ये पदाधिऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित
सभांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना संबंिधत अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागते. मात्र, िवधी मंडळात संबंिधत खात्याचा मंत्री उत्तर देताे. याच धर्तीवर सभांमध्ये पदाधिऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित असते. अायुक्तांनी सकारात्मकता दर्शवली.

अात्मपरिक्षण करण्याचा सल्ला
स्वच्छ भारत अभियानाचाही अाढावा त्यांनी घेतला. दरवर्षी ते हजार घरकुलांचे उद्दिष्ट समाेर ठेवण्यात येते. मात्र, याबाबतच्या समस्या का मिटल्या नाहीत, याबाबत अात्मपरिक्षण अावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

िवकासासाठी पदाधिकारी-प्रशासनात समन्वय अावश्यक असल्याचे मत अायुक्त गुप्ता यांनी व्यक्त केले. अनेकदा लहान कारणांवरून शाळा बंदच्या घटना घडतात, याकडे िशक्षणाधिकाऱ्यांनी बैठकीत लक्ष वेधले. मात्र, समस्या स्थािनकस्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतींनी साेडवणे अावश्यक असल्याचे अायुक्त म्हणाले. संबंिधत अधिकाऱ्यांनी तक्रार, समस्या थेट िजल्हाधिकारी, सीईओंकडे वर्ग करता त्यावर ताेडगा काढण्याचे प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...