आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवावर उदार होऊन 'मानसेवीं'चे कर्तव्य, शिवसेना वसाहत परिसरात दगडफेकीत एक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत समाविष्ट झालेल्या विविध ग्राम पंचायती मधील मानसेवी कर्मचारीही प्रशासनाच्या तोंडी आदेशाने जोखमीची कामे करीत आहेत. एक महिन्यापासून हे कर्मचारी काम करत असताना कोणतेही मानधन त्यांना मिळालेले नाही. अथवा महापालिकेत मानसेवी म्हणुन नियुक्तीचे आदेशही त्यांना दिलेले नाहीत. त्यामुळे जोखमीची कामे करताना एखादवेळी अनुचित प्रकार घडल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.

३० ऑगस्टला महापालिकेची हद्दवाढ झाली. महापालिका क्षेत्रात २४ ग्राम पंचायती समाविष्ट झाला. परिणामी महापालिकेचे क्षेत्रफळ २८ वरुन १२४ चौरस किलोमीटर झाले. तर लोकसंख्याही साडेपाच लाखापर्यंत करण्याचे आदेश दिले. परंतु हायकोर्टाच्या आदेशानुसार मनपाने कारवाई केली नाही. त्यामुळे केदारनाथ अग्रवाल यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली.ती प्रलंबित आहे. दरम्यान, मनपाने अतिक्रमण करणाऱ्या १२६ नागरिकांना नोटीस बजावली. पाच ऑक्टोबरला अग्रवाल यांना जागेची मार्किंग करण्यासाठी बोलावले.

मनपाचे क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, शाम ठाकूर, नरेश गोडाले, वाठुरकर, जयवंत सुळे यांचे पथक मोजणी करण्यास गेले. परंतु अग्रवाल मनपाच्या पथकासोबत आले नाही. त्यांनी त्यांचे प्रतिनिधी राजू म्हैसने यांना पाठवले. मनपाचे पथक घटनास्थळी जागेची मोजणी करण्यासाठी गेले होते. परंतु अतिक्रमणधारकांना हे पथक आपली घरे पाडण्यासाठी आल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे नागरिक जमा झाले. या गैरसमजातून दगडफेक झाली. या दगडफेकीत नगररचना विभागाचे अभियंता संदीप गावंडे हे जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दगडफेक झाल्याने पथकाने मोजणीचे काम थांबवले. या दगडफेकीत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. परंतु मानसेवी कर्मचारी मात्र जखमी झाला.

एकमेकांना तोंडी आदेश
प्रशासनाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देऊन या मानसेवी कर्मचाऱ्यांकडून कामे करुन घेण्याच्या सुचना केल्या आहेत. प्रशासनाच्या या तोंडी आदेशानुसार क्षेत्रीय अधिकारी या मानसेवी कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देऊन काम करवुन घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात क्षेत्रीय अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जोखमीची कामे
ग्राम पंचायतीतील मानसेवी कर्मचारीही पथदिवे दुरुस्ती, पाणी पुरवठा आदी विविध जोखमीची कामे करताहेत. एकीकडे आदेश नसताना तोंडी आदेशाने असे काम किती दिवस करावे? असा प्रश्नही या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केला आहे. परंतु अधिकारी केवळ तोंडी आदेश देऊनच या कर्मचाऱ्यांची बोळवण करीत आहेत.

विमाही नाही
कर्मचाऱ्यांचा विमा प्रशासनाने काढावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. एखादवेळी अनुचित घटनेत एखाद्या मानसेवी कर्मचाऱ्याचा जिव गेल्यास त्याच्या कुटुंबियाचे काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

महापालिका प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार
महापालिकेत महत्त्वाच्या विविध पदावर मानसेवी कर्मचारी कार्यरत आहेत. विविध भागात हे कर्मचारी नियुक्त आहेत. या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ दिली जाते. तीन ऑक्टोबरला या कर्मचाऱ्यांचे कामाचे आदेश संपुष्टात आले. यापूर्वीच त्यांना कामाचे आदेश देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे अद्यापही मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे गेलेला नाही. त्यामुळे मानसेवी कर्मचाऱ्यांना कामाचे आदेश नसताना कर्तव्य बजवावे लागत आहे. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवलेली नव्हती.
प्रोसेस सुर आहे
महापालिकेतकार्यरतमानसेवी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्तावाची प्रोसेस सुरु आहे. लवकरच हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला जाईल. -सुरेशसोळसे, उपायुक्त महापालिका
बातम्या आणखी आहेत...