आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात दुष्काळ घोषित! चार तालुक्यातील संपूर्ण गावेच दुष्काळग्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गेल्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्यामुळे अकोला जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. अकोट, तेल्हारा, बाळापूर मूर्तिजापूर या चार तालुक्यांतील संपूर्ण गावे दुष्काळग्रस्त असून, अकोला, बार्शिटाकळी पातूर हे तीन तालुके मिळून बारा गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त नोंदली गेली आहे.

पैसेवारीचे निकष ती घोषित करण्याच्या आधीच्या तारखांमध्ये बदल केल्याने या वर्षी राज्यभर बराच गोंधळ उडाला होता. परिणामी, परंपरागत पद्धतीने १५ जानेवारीच्या अंतिम पैसेवारीच्या आधारे घोषित केला जाणारा दुष्काळ या वर्षी बराच लांबला होता. याच काळात शासनाने २३ मार्च रोजी अंतिम िनर्णय घेतला. त्यानुसार ही स्थिती पुढे आली आहे.

या स्थितीच्या आधारे िजल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील १००९ गावांपैकी ९९७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सर्वाधिक १९१ गावे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अकोला तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल अकोट तालुक्यातील सर्वच्या सर्व १८३, मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वच्या सर्व १६४, बार्शिटाकळी उर्वरितपान

दुष्काळग्रस्त गावांची संख्या अशी
तालुके आणि गावांची संख्या

अकोला १९१
बार्शिटाकळी १५६
अकोट १८३
तेल्हारा १०६
बाळापूर १०३
पातूर ९४
मूर्तिजापूर १६४
एकूण ९९७

जाहीर केल्या उपाययोजना
पैसेवारीच्या निकषांवर जाहीर झालेला दुष्काळ पाहू जाता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शेतकऱ्यांसाठी उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये जमीन महसुलात (शेतसारा) सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, कृषिपंपाच्या वीज देयकात ३३.५ टक्के सूट, आवश्यक त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा, कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे अादींचा समावेश आहे.