आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात बोचऱ्या थंडीचा जाेर वाढला , नागरिकांकडून उबदार कपड्यांच्या खरेदीवर भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला : जिल्ह्यात बोचऱ्या थंडीत दिवसेंदिवस वाढ हाेत अाहे. तापमानात घट झाली असून, त्यांचा परिणाम मानवी जीवनावर होऊ लागला आहे. थंडीपासून बचावासाठी लोकरीचे कपडे खरेदीसाठी ही दुकानात गर्दी वाढू लागली आहे. दुसरीकडे हीच थंडी रब्बी पिकांसाठी पोषक ठरत आहे. 
शहरात बोचऱ्या थंडीला सुरुवात झाली असून थंडीची तिव्रता वाढत चालली आहे. रात्रीच्या वेळेला कडाका जाणवत असून पहाटेपासून हुडहुडी भरत आहे. शहर परिसरासह ग्रामीण भागाही गारठू लागला आहे. गावागावात शेकोट्याही पेटू लागल्या आहेत. रब्बी हंगामातील भाजीपाला, गहु, हरभरा या पिकांना वाढलेली थंडी पूरक आहे. 
 
उबदार लोकरी कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. शहरामध्ये स्वराज्य भवनजवळ, अकाेला क्रिकेट क्लब येथे स्वेटर, जर्कीन आदी उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्ये मोठ्यांसाठी स्वेटर, जर्कीन, फॅन्सी स्वेटर वेगवेगळ्या प्रकारचे उबदार कपडे तसेच युवकांसाठी फॅन्सी जॅकेट्स, फॅन्सी स्वेटर, जर्कीन तर लहान मुलांसाठी लाईटवेट स्वेटर, स्वेटरकाम कोट, हातमोजे आदी प्रकारचे कपडे विक्रीसाठी आले आहेत.
 
धुक्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. सलग तीन दिव सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांनी बाहेरील पर्यटस्थळांकडे धाव घेतली सून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून शेतातील हरभरा भाजून खाण्यावरही अनेकांनी भर दिला आहे. 

पिकासाठी उपाययोजना 
गहू, हरभरा, ज्वारी सारख्या पिकांसाठी थंडी पूरक ठरते. पिकांच्या वाढ प्रक्रियेत तसेच त्यांच्या अन्नघटक निर्मिती प्रक्रियेत सातत्य राखण्यासाठी शेतकऱ्यांना संजीवके फवारणी, युरियाची वाढीव मात्रा आदी उपाययोजना कराव्या लागतात. त्याच प्रमाणे पाण्याचे प्रमाणही कमी करुन पिकांची सतत काळजी घ्यावी लागते.असे असले तरी थंडीचे हे वातावरण रब्बी पिकांसाठी पोषक ठरत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...