आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा कंपन्यांची कीटकनाशके जप्त केल्याचा ‘कृषी’चा दावा; नागपूर खंडपीठात दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अवैध कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या सहा कंपन्यांची कीटकनाशके जप्त करून त्या कंपन्या व वितरकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने नागपूर खंडपीठात दिली. 

फवारणी मृत्यूच्या घटनांबाबतच्या याचिकेच्या सुनावणीत कृषी विभागाच्या मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. या याचिकेवर कृषी विभागाच्या प्रधान सचिवांसह यवतमाळ जिल्हाधिकारी, कृषी आयुक्तांना कोर्टाने नोटीस बजावली होती. परवाना नसताना कीटकनाशकांची विक्री केल्याबद्दल ९ व्यक्तींवर कारवाई झाल्याचेही विभागाने नमूद केले आहे. 
नागपुरात तीन एफआयआर : हर्बिसाइड टॉलरंट (एचटी) म्हणजेच तणनाशक प्रतिरोधक बियाण्यांची (चोर बीटी) विदर्भात यंदा मोठी लागवड झाली आहे. स्वदेशी जागरण मंचाचे संयोजक अमोल पुसदकर यांनी या अवैध बियाण्यांचा प्रकार जानेवारीत सर्वप्रथम उघडकीस आणला होता.
बातम्या आणखी आहेत...