आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये सहा हजार उमेदवारांचेे अर्ज दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील२२० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २० जुलै रोजी सायंकाळी वाजेपर्यंत आतापर्यंत हजार १८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची मंगळवारी तहसील कार्यालयात छाननी होणार आहे.
जिल्ह्यातील सातही तहसीलअंतर्गत ५३९ ग्रामपंचायती ग्रामदान मंडळे आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे नव्याने अस्तिवात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात येत आहे. सोमवार १३ ते २० जुलैदरम्यान उमेदवारांनी तहसील कार्यालयात िनवडणूक िनर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज सादर केले. सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात पाऊस बरसत होता. अशातही २० जुलै रोजी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली हाेती. याशिवाय िनवडणुकीच्या दृष्टीने जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्यासाठी िवभागीय जात पडताळणी कार्यालयातही उमेदवारांची गर्दी होती. जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीचे ७२० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतची निवडणूक गावात प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची, असा प्रणच उमेदवारांनी घेतलेला दिसून येतो.
ग्रामदान मंडळे जिल्ह्यातील सातही तहसीलअंतर्गत
५३९ ग्रामपंचायती
अधिकाऱ्यांना सूचना
तहसीलकार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तहसीलदार संतोष शिंदे यांनी नामनिर्देशन पत्राची छाननी इतर सूचना देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. एकही उमेदवार घाईत केलेल्या अर्जाच्या छाननीमुळे वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना तहसीलदार संतोष शिंदे यांनी दिली. मंगळवारी दिवसभर तहसील कार्यालय परिसरात निवडणूक अर्जांची छाननी होत आहे.
निवडणूक कार्यक्रम
{२१जुलै- अर्जांचीछाननी
{२३जुलै - नामनिर्देशनमागे घेण्याची तारीख
{२३जुलै - उमेदवारांनाचिन्ह वाटप यादी प्रसिद्ध
{४ऑगस्ट - मतदान
{६ऑगस्ट - मतमोजणी
तहसीलदार संतोष शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...