Home | Maharashtra | Vidarva | Akola | akola gram panchayat election

प्रत्येक पक्ष म्हणताे सरपंच अामचा; अन् सरपंचाला कळेना मी काेणाचा?

अजय डांगे | Update - Oct 10, 2017, 11:36 AM IST

यंदा सरपंचाची थेट ग्रामस्थांमधून झालेली निवड...परिणामी उभे झालेले नवे नेतृत्व...गावात काेणत्याही राजकीय पक्ष बांधणीला न

 • akola gram panchayat election
  अकोला - यंदा सरपंचाची थेट ग्रामस्थांमधून झालेली निवड...परिणामी उभे झालेले नवे नेतृत्व...गावात काेणत्याही राजकीय पक्ष बांधणीला निर्माण झालेले पाेषक वातावरण... याचा अागामी निवडणुकांमध्ये हाेणारा फायदा....यासर्व कारणांमुळे निवडून अालेला सरपंच अामचाच पक्षाचा असा दावा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी केला आहे. त्यामुळे राजकीय श्रेय लाटण्याच्या दाव्यांमुळे आता सरपंचांनाच कळेना की नेमक्या तो काेणत्या पक्षाचा?, अशी काहीशी स्थिती साेमवारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात पहावयास मिळाली.

  लाेकसभा, विधानसभा, नगर परिषद , महापालिका निवडणुकांंमध्ये बहुमत मिळल्यानंतर भाजपने अाता ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरु केली अाहे. भाजपला राेखण्यासाठी सध्या सर्वाधिक शिवसेना अाक्रमकपणे समाेर येत असून, अातापर्यंत सरकारच्या विराेधात जिल्ह्यात चार वेळा अांदाेलने केली. भाजपला काेंडीत पकडण्याची कांॅंग्रेस, राष्ट्रवादी भारिप-बमसंही संधी साेडताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या जि.प. निवडणुकीत प्रचंड घमासान हाेण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

  काेणत्या पक्षाने किती केले दावे ?
  भाजप
  : जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात यांनी भाजपचे १४६ सरपंच निवडून अाल्याचा दावा केला अाहे. हे सरपंच मुळातच भाजप बुथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते असल्याचे थाेरात यांचे म्हणणे अाहे.
  शिवसेना: जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शिवसेनेचे १०४ सरपंच निवडून अाल्याचा दावा केला अाहे. नाेटाबंदी, रखडलेला विकास, कर्जमाफी, महागाई या मुद्यावरुन ग्रामस्थांनी भाजपला नाकारल्याचे देशमुख यांचे म्हणणे अाहे.
  कांॅग्रेस: जवळपास१५० सरपंच हे काँग्रेसचे असल्याचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे म्हणणे अाहे. लवकरच पक्ष विजयी उमेदवारांचा सत्कार साेहळा अायाेजित करणार असून, त्यानंतर चित्र स्पष्ट हाेईल, असेही पटेल यांनी सांगितले.
  राष्ट्रवादी काँग्रेस : जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांनी ६५ ते ७० सरपंच हे राष्ट्रवादी कांॅग्रेसचे असल्याचा दावा केला अाहे.
  भारिप-बमंस: जिल्ह्यात भारिप -बमंसचे ८८ सरपंच निवडून अाल्याचा दावा पक्षाचे कार्याध्यक्ष काशिराम साबळे यांनी केला अाहे.

  सरपंच पदाच्या २७२ जागा हाेत्या. निवडणूक काेणत्याही अधिकृत राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यात अाली नाही. सरपंच पदाच्या निवडणुुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेना कांॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस भारिप-बमंस या पक्षांनी विजयी सरपंचांवर दावे केले. या पाचही राजकीय पक्षांनी केलेल्या दाव्यांची संख्या मात्र ५५८ हाेत अाहे. त्यामुळे सरपंचांची अाेढाताण हाेणार असून, पक्ष प्रवेशासाठीही राजकीय पक्षांकडून तगादा लावण्यात येणार अाहे. त्यामुळे काेणते सरपंच काेणत्या पक्षाचे अाहेत, हे चित्र स्पष्ट हाेण्यासाठी बरीच प्रतिक्षा करावी लागणार अाहे.

Trending