आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यातील लैंगिक शोषण झालेल्‍या तरुणाला दिली जीवे मारण्‍याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला – माजी संस्‍थाचालक आणि माजी सचिवाकडून लैंगिक शोषण होत असल्‍याचा आरोप केलेल्‍या तरुणाला काल (मंगळवार) रात्री 11 वाजताच्‍या सुमारास चार अनोळखी युवकानी जीवे मारण्‍याची धमकी दिली. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित युवक हा काम आटोपून डाबकी रोडवरील आपल्‍या घराकडे जात होता. त्‍याच्‍यावर पाळत ठेवून असलेल्‍या चार युवकांनी त्‍याची दुचाकी अडवली आणि ‘तक्रार मागे घे नाही तर जीव गमावशील’ अशी धमकी दिली. त्‍यामुळे पीडित तरुण प्रचंड दहशतीखाली आहे.
लैंगिक शोषण करणारे दोघेही वृद्ध
भारतीय सेवा सदन संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष नीरंजनकुमार गोयनका (वय ८०) आणि सचिव जुगलकिशोर रुंगटा (वय ७०) यांनी लैंगिक शोषण केल्‍याचा आरोप 27 वर्षीय युवकाने केला आहे. यातील नीरंजनकुमार यांचे वय 80 तर जुगलकिशोर यांचे 70 वर्षे आहे. या दोघांविरुद्ध सिव्हिल लाइन पोलिस ठाण्‍यात भादंविच्‍या कलम ३७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
चित्रफीत दाखवली
युवकावर सातत्याने होणारे अत्याचार तसेच नोकरीसाठी झुलवत असल्यामुळे युवक त्रस्त झाला होता. त्यामुळे या अनैसर्गिक कृत्याचे त्याने स्वत:च स्टिंग करीत व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ घटनेचा पुरावा म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी चित्रफीत पाहून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.