आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने साध्य झाले उद्दिष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला पाटबंधारे विभागाने २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात उद्दिष्टांच्या ११७ टक्के वसुली केली आहे. चार कोटी ८७ हजार वसुलीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात चार कोटी ६७ लाख रुपयांची वसुली विभागाने केली. अधिकारी कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी पुढाकार घेतल्याने हे उद्दिष्ट गाठता आले, अशी माहिती अकोला पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
अकोला पाटबंधारे विभागाकडे एक मोठा, तीन मध्यम ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून सिंचन बिगर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच औद्योगिक वसाहतीलाही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाटबंधारे विभागाला सिंचन तसेच बिगर सिंचन पाणीपट्टी तसेच स्वामित्व वसुली करावी लागते. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात सिंचनाचे २८ लाख ७७ हजार तर बिगर सिंचनाचे तीन कोटी ७२ लाख (थकबाकी वगळून) असे एकूण चार कोटी ८७ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. पाटबंधारे विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी सतत पाठपुरावा केल्याने सिंचनाच्या २८ लाख ७७ हजारपैकी ११ लाख १५ हजार तर बिगर सिंचनाच्या तीन कोटी ७२ लाखपैकी चार कोटी ५६ लाख अशी एकूण चार कोटी ६७ लाख १५ हजार रुपये वसुली झाली. त्यामुळे उद्दिष्टाच्या अधिक वसुली िवभागाला करता आली. महापालिका मूर्तिजापूर नगरपालिकेकडे असलेल्या थकित रकमेपैकी काही रकमेचा भरणा या दोन्ही स्वराज्य संस्थांनी केल्याने १०० टक्केपेक्षा अधिक वसुली होऊ शकली.