आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"किराणा बाजारा'ला केले सील, महंमद अली चौक परिसरात तणावपूर्ण वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- होलसेल किराणा बाजाराचे १६ नोव्हेंबरपासून स्थानांतरण सुरू झाले आहे. दरम्यान, १७ नोव्हेंबरला सायंकाळी पोलिस प्रशासनाने किराणा बाजाराच्या मार्गावर बॅरिकेट्स लावले. बॅरिकेट्स लावल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. दुचाकीसह चारचाकी वाहनांचीही वाहतूक बंद झाल्याने महंमद अली चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

होलसेल किराणा बाजारामुळे सुभाष मार्ग, गांधी मार्ग, टिळक मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे होलसेल किराणा बाजार स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्याच दिवशी ४० टक्केपेक्षा अधिक व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांचे स्थानांतरण केले. प्रशासनाने व्यावसायिकांना सात दिवसांचा अवधी स्थानांतरासाठी दिला आहे. दुपारच्या सुमारास जी व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होती, त्यांच्या नावाची नोंदही पोलिस प्रशासनाने केली, तर सायंकाळी किराणा बाजाराच्या मार्गावर बॅरिकेट्स लावण्यात आले. बॅरिकेट्स लावल्याने वाहतूक ठप्प झाली. परिणामी, घटनास्थळावर व्यावसायिकांसह नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिस ताफाही घटनास्थळी दाखल झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

किराणा बाजाराच्या मार्गावर पोलिस प्रशासनाने सायंकाळी बॅरिकेट्स लावल्याने वाहतूक बंद झाली. महंमद अली चौकात तणावाचे वातावरण होते.