आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायटेक युगातही ४७३ ग्रंथालये तेवून ठेवताहेत ज्ञानवृद्धीची ज्योत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - टीव्ही आला, संगणक युग सुरु झाले, हायटेक मोबाईलमुळे सोशल मीडियाही वाढला. परंतु ही सारी आक्रमणे बाजूला सारुन ज्ञानवृद्धीची ज्योत तेवत ठेवण्याची धडपड वाचनालय-ग्रंथालयांनी सुरु ठेवली आहे. जिल्ह्यात आजघडीला अशा संस्थांची संख्या ४७३ आहे. किंबाहूना या संस्थांच्या आधारेच नागरिकांची वाचन चिंतनाची निकड भागवली जात आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे शासनाला पाठवलेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली असून यामध्ये सर्वोत्कृष्ट श्रेणीच्या सहा संस्थांचा समावेश आहे. 'ब' श्रेणीत मोडणारी ९०, 'क' श्रेणीत मोडणारी १५१ 'ड' श्रेणीची २२६ ग्रंथालये िजल्हाभर पसरलेली आहे. या संस्थांच्या माध्यमातून अकोल्यासह दूरवरच्या खेड्यांतील नागरिकांना वाचनाच्यादृष्टीने समृद्ध केले जात आहेत. ग्रंथालयाची इमारत, तेथील ग्रंथसंख्या, वृत्तपत्रे नियतकालिके, वाचक संख्या आदी बाबींवरून त्या-त्या ग्रंथालयाची श्रेणी ठरवली जाते. या श्रेणीलाही पुढे जिल्हा, तालुका आणि इतर अशा तीन प्रकारच्या सीमारेषा लावून त्या संस्थांची विभागणी केली जाते.

या विभागणीनुसार श्रेणीत मोडणारी सहा ग्रंथालये असून त्यात िजल्हास्तरीय एक, तालुका स्तरावरील दोन तर इतर श्रेणीची तीन ग्रंथालये आहेत. श्रेणीत मोडणारी िजल्हास्तराची एकही संस्था नाही. मात्र तालुका स्तरावर याच श्रेणीत मोडणारी दोन तर इतर श्रेणीत मोडणारी तब्बल ८८ ग्रंथालये आहेत. श्रेणीतील एकूण ग्रंथालयांची संख्या १५१ आहेत. यात तालुकास्तरीय दोन आणि इतर श्रेणीच्या १४९ संस्थांचा समावेश आहे. ही श्रेणी केवळ छोट्या गावांसाठी आहे.

जिल्हास्तरावर एकमेव सर्वोत्कृष्ट : शासकीयिवभागणीनुसार जिल्हा पातळीवर सर्वोत्कृष्ट अर्थात 'अ' श्रेणीचे केवळ एकमेव ग्रंथालय आहे. टिळक रोड वरील बाबूजी देशमुख ग्रंथालय हे या संस्थेचे नाव. शतकोत्तरी परंपरेचे द्योतक असलेल्या या ग्रंथालयात ऐतिहासिक प्राचीन संदर्भ असलेला भला मोठा ग्रंथसाठा आहे, अशी शासकीय नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...