आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारुप मतदार यादी वेबसाईटवर, आज होऊ शकते यादीची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या अनेक दिवसापासून इच्छुकांना उत्सुकता लागलेली महापालिका निवडणुकीतील प्रारुप मतदार यादी १२ जानेवारीला वेबसाईटवर प्रसिद्ध झाली. इच्छुकांना ही यादी १३ जानेवारीला विक्रीसाठी उपलब्ध राहणार असून सर्वाधिक मतदार तूर्तास तरी प्रभाग क्रमांक १० मध्ये २९ हजार ४६२ तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक मध्ये १६ हजार ९६४ आहेत. १७ जानेवारी पर्यंत नागरिकांना सुचना, हरकती दाखल करता येणार आहेत. या दुरुस्त्या केल्या नंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

या निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडुन दिले जाणार आहेत. या अनुसार प्रभाग रचना करण्यात आली. २३ हजार ते २९ हजार लोकसंख्या नुसार प्रभाग तयार करण्यात आले. या नंतर मतदार याद्यांचे काम सुरु करण्यात आले होते. प्रारुप मतदार याद्यांचे काम पूर्ण झाल्या नंतर नियोजनानुसार मुंबई येथून वेबसाईटवर ही प्रारुप मतदार यादी १२ जानेवारीला प्रसिद्ध झाली. चार लाख ७६ हजार ६२ मतदार संख्या आहे. सुचना, हरकती नंतर हा आकडा थोडाफार कमी होऊ शकतो. त्याच प्रमाणे प्रभागांच्या मतदारांच्या संख्येतही फेर बदल होऊ शकतात. नाव चुकले असेल, ज्या प्रभागात मतदार राहतो, त्या ऐवजी दुसऱ्या प्रभागात नाव दाखल झाले असेल, याबाबत प्रत्यक्ष मतदारांनाच अर्ज दाखल करुन दुरुस्ती करावी लागणार आहे. पहिल्या यादीत चार लाख ४० हजार ८५१ मतदारांची संख्या होती तर पुरवणीत ३५ हजार २११ ने मतदार संख्या वाढली आहे. 

प्रभाग पाचमध्ये १८४ पुरुष मतदार अधिक 
पुरुषमतदारांच्या तुलनेने महिला मतदार १५ हजार ३०१ ने कमी आहे. प्रभाग क्रमांक पाच मध्ये पुरुष मतदारांची संख्या दहा हजार ९१६ तर महिला मतदारांची संख्या दहा हजार ७३२ आहे. पुरुषांच्या तुलनेने महिला केवळ १८४ ने कमी आहेत. ही आकडेवारी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कोणत्या भागात किती मतदार आपल्या बाजूचे आहेत याचाही विचार करून उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. 

२३ मतदार इतर मध्ये 
यावेळी महिला- पुरुष या सोबतच इतर प्रकारात मोडणाऱ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण मतदारात २३ मतदार हे इतर मध्ये आहेत. प्रभाग क्रमांक दोन, प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रत्येकी १, प्रभाग क्रमांक तीन, दहा आणि तेरा मध्ये प्रत्येकी तर प्रभाग क्रमांक चार, बारा,पंधरा, सोळा, सतरा आणि अठरा मध्ये प्रत्येक दोन मतदार आहेत. 

पुरुष मतदार ५१.६० तर महिला ४८.३८ टक्के 
एकूण मतदार लाख ७६ हजार ६२ असून यात पुरुषांची संख्या दोन लाख ४५ हजार ६७५ तर महिलांची संख्या लाख ३० हजार ३६४ आहे. महिला आणि पुरुषांच्या टक्केवारीत मोठी तफावत नाही.ही दिलासा दायक बाब आहे. पुरुष मतदारांची टक्केवारी ५१.६० तर महिला मतदारांची ४८.३८ टक्के आहे.