आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची सभा हाेणार मंगळवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेची मंगळवारी दुपारी एक वाजता सर्व साधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत स्वच्छता आराखडा तयार करण्यासह विविध नऊ विषयावर चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान आयुक्त मुंबईला जात असल्याने ही सभा पुढे ढकलल्या जाते का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान विकास योजने अंतर्कत डी.आय. पाइप लाइन रोडच्या बाजूने शिफ्ट करण्याचे अंदाज पत्रक मंजुर करणे, पंडीत दिनदयाल अंत्योदय योजनेच्या घटकांर्तगत महापालिका शाळा क्रमांक दोन ची जागा बेघरांसाठी निवारा उभारण्यासाठी देण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे, महापालिकेच्या स्वच्छता आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे, मानधनतत्वावरील अब्दुल मतीन यांना मुदतवाढ देणे तसेच महापौरांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करुन निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

सभा होणारच
आयुक्त २६ऑक्टोंबर पर्यंत नाहीत. त्यानंतर २८ ऑक्टोबर पासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. त्यामुळे सलग सुट्या राहतील. तसेच त्यामुळे सभा पुन्हा लांबणीवर पडू शकते. मानसेवी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याने मंगळवारी आयोजित सभा ही त्याच दिवशी होईल.'' -उज्वला देशमुख, महापौर
बातम्या आणखी आहेत...