आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांचा "लेखाजोखा' म्हणजे शिवसेने सोबत धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - "महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या प्रत्येक शब्दात मीपणा होता. एक वर्षांच्या काळात जो काही विकास केला तो त्यांनी एकट्यांनीच केला, असे पत्रकार परिषदेतून दाखवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो. सत्तेतील मित्रपक्षांसोबत असा व्यवहार जर महापौर दाखवत असतील, तर खपवून घेणार नाही', असा इशारा उपमहापाैर विनोद मापारी यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांना दिला. उपमहापौर मापारी आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत हाेते. विशेष म्हणजे कालच महापौरांनी महापालिकेतील सत्तापूर्तीला एक वर्ष झाल्याबद्दल पत्रकार परिषद घेतली होती. त्यात शिवसेनेला डावलले होते.
महापालिकेत सत्ताबदल होऊन भाजप-शिवसेनेच्या सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने विकासकामांचा लेखाजोखा महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रगती पुस्तक काढून केला. या प्रगती पुस्तकावर केवळ भाजपचाच उल्लेख केला. त्यावर केवळ शहर ते दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांचेच फोटो छापले. शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो तर सोडाच साधा नामोल्लेखही केला नाही. तसेच पत्रकार परिषद घेऊन भाजपने शहरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. हे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या जिव्हारी लागले. त्यांनी तत्काळ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आपली भूमिका मांडण्यासाठी महापालिकेत दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपमहापौर मापारी म्हणाले की, महापालिकेत दोन्ही पक्ष खांद्याला खांदा लावून काम करत असताना, महापौर यांनी शिवसेनेशी चर्चा करता एक वर्षाच्या कामकाजाचे पुस्तक छापले. त्यावर भाजपच्याच नेत्यांचे फोटो छापले आणि त्यांनीच कामे केली, त्यात शिवसेनेचे कोणतेही योगदान नाही, असे जाणूनबुजून दाखवले. महापौरांचा हा प्रयत्न म्हणजे मीपणा अाहे. आपण सुचवलेले प्रश्न त्या कधीही मान्य करत नाही. १५ कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन करताना त्यांनी आम्हाला किंवा आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले नाही. महासभेच्या आधी आमच्याशी चर्चा करत नाहीत. महापौरांच्या या स्वभावामुळेच त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी त्यांना एकाकी पाडले होते. आजपर्यंतच्या अनेक सभा महापौरांनी स्थगित केल्या आहेत, त्यांनी कोणताही विकास केला नाही. जे काही केले ते भाजप-सेनेने केले. महापौरांमध्ये जर बदल झाला नाही, तर सत्तेत राहायचे की नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल, असेही मापारी म्हणाले. या वेळी पत्रकार परिषदेला नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक पंकज गावंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, शिवसेनेचे नेते तरुण बगेरे उपस्थित होते.

...तरआम्हालाही भाजपची गरज नाही : कामआमचे, श्रेय त्यांचे, असा प्रकार महापालिकेत सुरू आहे. महापौरांच्या वागण्यावरून असे वाटते की, शिवसेनेची त्यांना गरज नाही. असे असेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही. मात्र, आम्ही जनतेसोबतचा धोका सहन करणार नाही. विकासासाठी त्यांच्यासोबत राहू, पण भ्रष्टाचाराशी साथ देणार नाही, असेही मापारी म्हणाले.

उपमहापौरांचे आरोप चुकीचे
^उपमहापौरांचे आरोप चुकीचे आहेत. कोणत्याही सभेपूर्वी आम्ही चर्चा करतोच. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आपण लेखाजोखा मांडला. मी माझ्याच पक्षाचा लेखाजोखा मांडेल, दुसऱ्या पक्षाचा कसा मांडेल. '' उज्ज्वला देशमुख, महापौर

हा तर त्यांचा घमेंडपणा
^विधानसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत भाजपाने अंधारात ठेवले. विकास करायचा असेल तर विरोधकांनाही मान द्यावा लागतो. मात्र तसे होताना दिसत नाही. काही लोकांनी प्रगती पुस्तक छापले, त्यात शिवसेनेचा साधा उल्लेख नाही. हा त्यांचा घमेंडपणा आहे. या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठांना कळवणार. युती तुटली नसतानाही विधानपरिषदेत उलटसुलट बोलणे योग्य नाही. काहींंकडून जाणूनबुजून तसे होत आहे.'' गोपीकिशनबाजोरिया, आमदार