आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई, 27 हजाराचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाद्वारे शनिवारी ‘स्वच्छता हीच सेवा’, या मोहिमेअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात अाली. मनपाने संबंधितांना २७ हजारांचा दंड अाकारला.
 
महापालिकेने फतेह चाैक ते दीपक चाैक, निता गेस्ट हाऊस समोरील भंगार बाजार परिसरात माेहिम राबवली. भंगारवाल्यांचे भंगाराचे अतिक्रमणे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. ही मोहिम उपायुक्त समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात अाली. कार्यवाहीत क्षेत्रीय अधिकारी नंदकिशोर उजवणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अ.मतीन, शाम बगेरे, आरोग्य निरीक्षक आय.एम.काजी, अ.सलीम, नितीन नागलकर, मो.अलीम, प्रकाश मनोहर, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे नरेंद्र घनबहादूर, विजय बडोणे, आरोग्य निरीक्षक सुरज खेंडकर, अजितसिंह कोचर, सुरज गणेदे सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.

यांच्यावर झाली दंडात्मक कार्यवाही मोहीमे दरम्यान फेमस आॅटो डील हजार, लकी आॅटो डील हजार, डायमंड आॅटो डील हजार, सम्राट आॅटो डील हजार, अकोला आॅटो डील हजार, साजीद गाजी आॅटो डील हजार, साजीद खां भंगार वाले हजार, हाजी शरीफ खान हजार, वकार खा यासीन खा हजार, ईरफान टायर २०० रुपये, सम्राट ऑटोमोबाईल ३०० रुपये, अकोला प्लायवुड १०० रुपये, सांई एजन्सी ३०० रुपये असे एकूण २६ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
 
...तर राेज हाेणार कार्यवाही
मोहिमेअंतर्गत मनपा उपायुक्तांनी परिसरातील नागरिकांना आपल्या घरात प्रतिष्ठानात निघणारा ओला सुक्का कचरा वेगवेगळ्या डस्टबीन मध्ये गोळा करुन रस्त्यावर टाकता मनपाच्या कचरा घंटा मध्येच टाकावा, असे अावाहन केले. परिसरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर-यांवर दररोज दंडात्मक करण्यात येण्यात असल्याचे उपायुक्तांनी कळवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...