आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप-बमसं अाणि प्रहार संघटना एकत्र येण्याचे मिळाले संकेत? लवकरच चित्र स्पष्ट हाेण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारिप-बमसं प्रहार संघटना एकत्र येण्याचे संकेत शुक्रवारी प्राप्त झाले. प्रहारचे संघटनेचे अामदार बच्चू कडू यांनी भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब अांबेडकर यांची भेट घेतली. लवकरच याबाबत अंतिम निर्णय हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अॅड. अांबेडकर यांनी निरीक्षक उपसमिती प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. शुक्रवारी भारिप-बमसंतर्फे पुढील रणनिती स्पष्ट हाेण्याची शक्यता अाहे. 

मनपा निवडणुकीसाठी तूर्तास तरी या भाजप-शिवसेनेने युतीबाबत निर्णयाची घाेषणा केलेली नसून, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी एकला चलाे रेची घाेषणा केली अाहे. या निवडणुकीत भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर या निवडणुकीतही सोशल इंजिनिअरिंगचा वापर करु शकतात. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना भाजप या चार पक्षात होणाऱ्या मत विभाजनाचा फायदा भारिप-बमसंला काही प्रमाणात मिळू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत अाहे. 

उद्यापासून अर्ज विक्री? : मनपानिवडणुकीसाठी भारिप-बमसंने उमेदवार निवडीची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला अाहे. १५ १६ जानेवारी राेजी अर्जाची विक्री करण्यात येणार अाहे, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. १७ जानेवारी राेजी अर्ज स्वीकारण्यात येणार अाहेत. २० जानेवारी राेजी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय भारिप-बमसंने घेतला अाहे. 

उपसमितीचे कामकाज सुरू : मनपा निवडणुकीसाठी भारिप-बमसंने गठित केलेल्या निरीक्षक उपसमितीने कामकाज सुरु अाहे. दाेन दिवसांनतर प्रभागनिहाय अाढावा घेण्यात येणार असून, त्यानंतर पुढील दिशा निश्चित हाेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. ही उपसमिती जनरल सेक्रेटरी ज. वी. पवार यांनी गठित केली अाहे. बालमुकुंद भिरड यांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या या उपसमितीमध्ये माजी आमदार हरिदास भदे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डाॅ. प्रसन्नजित गवई, अासिफ खान यांचा समावेश अाहे. 

अॅड. आंबेडकर आमदार कडू यांच्यात चर्चा 
पदवीधरमतदारसंघाची निवडणूक तसेच अकोला महापालिका निवडणुकीसंदर्भात भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आमदार बच्चू कडू यांची शुक्रवारी दुपारी भेट झाली. अॅड. आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचे कडू यांनी सांगितले. दुसऱ्या भेटीमध्ये निवडणुकीचे धोरण निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले. बच्चू कडू शुक्रवारी एका कार्यक्रमािनमित्त अकाेल्यात अाले हाेते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपराेक्त माहिती दिली.