आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या घोषणेबाबत उत्सुकता शिगेला, मंत्रीमंडळाची मंगळवारी होणारी बैठक झाली सोमवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यमंत्री मंडळाची मंगळवारी होणारी बैठक सोमवारी घेण्यात आल्याने सोमवारी दुपारी अथवा मंगळवारी महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होईल? अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मंगळवारी सायंकाळी पाच पर्यंत निवडणुकीची घोषणा झाल्याने आता निवडणुकीच्या घोषणेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच बरोबर अद्याप महापौरांच्या आरक्षणाची सोडत झाल्यानेही संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. 

राज्य निवडणुक आयुक्त सहारीया अकोला दौऱ्यावर आले असता त्यांनी १५ जानेवारीच्या आत निवडणुकीची घोषणा होईल, असे स्पष्ट केले होते. त्यातच कॅबीनेटची मिटिंग एक दिवस आधी घेतल्याने सोमवारी सायंकाळी अथवा मंगळवारी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु निवडणुकीची घोषणा झाल्याने उत्सुकता शिगेला पोचली आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीची घोषणा चार जानेवारीला करण्यात आली होती तर मतदान १६ फेब्रुवारीला घेण्यात आले होते. त्यावेळी ४४ दिवसांची आचार संहिता होती. मात्र २०१२ च्या निवडणुक कार्यक्रमात मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचाही कार्यक्रम होता. या निवडणुकीत मात्र मतदार याद्या तयार करणे, प्रारुप यादी जाहिर करणे, सुचना हरकती घेणे आणि अंतिम यादी प्रसिद्ध करणे याबाबतची कार्यवाही निवडणुक आयोगाने आधीपासूनच सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आचार संहितेचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे. बारावीचे पेपर फेब्रुवारी तर दहावीचे पेपर मार्च मध्ये होत असल्याने त्यापूर्वी निवडणुका मार्गी लागणेही आवश्यक आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणुकीच्या घोषणेची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
 
आरक्षणाची सोडत झाल्यानेही संभ्रम 
अद्यापमहापौरांच्या आरक्षणाची सोडत झाल्यानेही संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अाता महापालिका महापाैर पदासाठी अारक्षण साेडत कधी हाेते, याकडेही इच्छूकांचे लक्ष लागले अाहे. त्यावर अनेक राजकीय घडामाेडी घडतील असा अंदाज वर्तवल्या जात अाहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीची घोषणा चार जानेवारीला करण्यात आली होती