अकोला - महापालिकानगर रचना विभाग आणि अतिक्रमण हटाव पथकाने जानेवारी रोजी सिंधी कॅम्प परिसरात अनधिकृत बांधकामावर जेसीपी चालविला. दरम्यान संबंधिताने स्वत: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरु केल्याने महापालिकेने ही कारवाई थांबवली.
संजय थावरानी यांचा नझुल शिट क्रमांक ५६ मौजे अकोला खदान भागात २५ फुट लांबीचा प्लॉट होता. यापूर्वी या जागेत प्रतिष्ठान होते. या जुन्या प्रतिष्ठानाच्या जागी नवीन बांधकाम सुरु केले होते. स्लॅप टाकून शटरही लावण्यात आले होते. दरम्यान आयुक्त अजय लहाने यांच्या हे बांधकाम नजरेस पडले.त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुचना देऊन या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, नगररचना विभागाचे राजेंद्र टापरे यांच्यासह अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरु केली. दरम्यान संजय थावरानी यांनी बांधकाम स्वत: पाडण्याचे काम सुरु केल्या नंतर महापालिकेने अतिक्रमण पाडण्याची कारवाई थांबवली. मात्र महापालिकेचे अधिकारी घटनास्थळीच थांबले होते.