आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच पैकी तीन नगराध्यक्ष भाजपचे, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातीलनगर पालिका प्रभाग नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल साेमवारी जाहीर झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत तेल्हारा, अकोट मूर्तजिापूर येथे कमळ फुलवले. बाळापूर पातूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार िवजयी झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला असून, पातूर अकोट येथील जागा कायम राखण्यात पक्षाला अपयश आले. जिल्ह्यात प्रभाग निवडणुकीत मात्र काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे एकूण ३२ तर भाजपचे ३१ नगरसेवक निवडून आले. िशवसेना भािरप-बमसंचा नगराध्यक्षपदाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
भाजप-सेनेतील संबंध ताणले गेले असतानाच नगराध्यक्ष, नगरपालिका निवडणूक दाेन्ही पक्ष स्वबळावर लढले. याचा फायदा भाजपला झाल्याचे निवडणूक निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. तीन िठकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार िवजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीने तेल्हारा अकोट येथे आघाडी केली हाेती. दाेन्ही पक्षांचे गत एका दशकापेक्षा जास्त काळापासून लाेकसभा िवधानसभेत एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत दाेन्ही पक्षांनी कंबर कसली हाेती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला. पातूर बाळापूर येथे काँग्रसचे नगरध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले. यािठकाणी काँग्रेस-राकाँ हे पक्ष स्वतंत्र लढले. भािरप-बमसं, िशवसेना एमआयएमला या निवडणुकीत पराभवाला सामाेरे जावे लागले आहे.
राष्ट्रीयपक्षांना अच्छे दिन, प्रादेिशक पक्षांची पिछेहाट : निवडणुकीतराष्ट्रीय पक्षांना अच्छे दिन, प्रादेिशक पक्षांची पिछेहाट झाल्याचे निकालावर नजर टाकल्यास दिसून येते. यापूर्वी सन २०११ मध्ये झालेल्या नगरपािलका निवडणुकांमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ नगरसेवक निवडून आले हाेते. काँग्रेसचे १६, भाजप-१३, िशवसेना-३ भािरप-बमसंचे ११ उमेदवार निवडून आले हाेते. यंदा २०१६मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला सर्वाधिक फायदा झाल्याचेे दिसून येते. िशवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुक्रमे जागा वाढली.

आमदारभाऊ पराभूत : मूिर्तजापूरयेथील प्रभाग क्रमांक मध्ये आमदार हरीश िपंपळे यांचा चुलत भाऊ भाजपचे उमेदवार अमाेल ईश्वरआप्पा पिंपळे हे पराभूत झाले. त्यांचा पराभव िशवसेनेचे आशिष बरे यांनी केला. िपंपळे यांना ३८७ तर बरे यांना ५९६ मते िमळाली. मूर्तजिापूरमध्ये नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार िवजयी झाला असला तरी आमदार पिंपळे यांना आपल्या पुतण्याचा पराभव राेखता आला नाही.
...तर अकोटातीलिचत्र वेगळे असते :अकोटमधील निवडणुकांमध्ये एमआयएमने उडी घेतली हाेती. अल्पसंख्यांक, दलितंासाठी अत्यंत आक्रमकपणे आणि कोणताही आड पडदा ठेवता पुढाकार घेणारा, अशी एमआयएमची ओळख आहे. अकोट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला १७ हजार ५९६ मते िमळाली. एमआयएम-२२७२ आिण काँग्रेस उमेदवाराला हजार २७६ मते िमळाली. दलित आिण अल्पसंख्यांक मतांचे िवभाजन झाले नसते तर नगरध्यक्षपदाच्या निकालाचे िचत्र वेगळे असते.
भारिप-बमसंची पिछेहाट : बाळापूरिवधानसभा मतदारसंघ भािरप-बमसंच्या ताब्यात आहे. सलग दाेन वेळा भािरप-बमसंचा आमदार निवडून येत आहे. नगराध्यक्ष नगर पािलका प्रभाग निवडणुकीत भािरप-बमसंनेे बाळापूरमध्ये एमआयएमशी घराेबा केला हाेता. मात्र, बाळापूर िवधानसभा मतदार संघात येत असलेल्या बाळापूर पातूर येथे भािरप-बमसंचा धुव्वा उडाला. अकोट येथे तीन उमेदवार तेल्हारा येथे केवळ एकच उमेदवार निवडून आला. अकोट तेल्हारा पंचायत समिती भािरप-बमसंच्या ताब्यात आहे. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षही हे दाेन्ही तालुक्यातीलच आहेत. कार्याध्यक्षपदही तेल्हारा तालुक्यात आहे. असे असतानाही भािरप-बमसंची या निवडणुकीत प्रचंड िपछेहाट झाली.
भाजपकडूनजल्लाेष : निवडणुकीतिमळालेल्या यशाचा जल्लाेष भाजप कार्यकर्त्यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात होते. या वेळी आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती वजिय अग्रवाल, माजी महापौर सुमन गावंडे, रवी गावंडे, नाना कुलकर्णी, चंदाताई शर्मा, अनुप गोसावी, डॉ. वनिोद बोर्डे, संजय जिरापुरे, धनंजय गिरीधर, दिलीप सांगळे,डॉ. पवन कोल्हे पवन पडिया, जयंत मसने, गणेश अंधारे, विलास पोटे, सुरेश अंधारे, बाळताले, राजेंद्र गिरी, उकंडराव सोनोने, निलेश ननिोरे, वजिय परमार, चंदा ठाकूर, अनिल गावंडे, अण्णा उमाळे, रतन गिरी, हरिभाऊ काळे आदी उपस्थित होते.

३४ पालिकांचे नवे शिलेदार
^यापूर्वी शिवसेना-भाजपचीयुती असताना िशवसेनचे उमेदवार वाढले नव्हते. यंदा मात्र स्वळावर लढल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार आणि मतेही वाढली. अपेक्षितनुसार यश िमळाले नसले तरी, १५ जागांवर िशवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नितीनदेशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना.

^जिल्हयातही भाजपअर्थात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची लाट हाेती, असेच निकालवरुन दिसून येते. अनेक िठकाणी खूप थाेड्या मतांनी भारिप-बमसंच्या उमेदवारांचा पराभव झाला. निकालाचे िवश्लेषण करण्यात येईल. काशिरामसाबळे, कार्याध्यक्ष, भारिप-बमंस.

^नगराध्यक्ष, नगरपािलका प्रभाग निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढले. मतांची टक्केवारीही वाढली. अनेक िठकाणी राकाँचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर हाेते. त्यामुळे यापुढेही पक्ष दमदार कामगिरी करेल. िवजयदेशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

^नगराध्यक्ष, नगरपािलका प्रभाग निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढली. नगरसेवकांची संख्या दुप्पटीने वाढली. यानंतरही जिल्हयात काँग्रेसला चांगले दिवस येतील. येणाऱ्या महापालिका, जि.प. च्या निवडणूकीत आणखी यश मिळेल. िहदायतपटेल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

^तीन पिढीच्याकार्यकर्त्यांनी व्यक्ती पेक्षा संघटनेला महत्व देऊन बंडखोरी करता एकदिलाने पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. त्यमुळे भाजपाला यश मिळाले. बाळापुर पातुर अपयशाचे मंथन करून मनपा जि.प. निवडणुकीत झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करु. तेजरावथोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप.
बातम्या आणखी आहेत...