आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात नवरीची धुमधडाक्यात वरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकीकडे स्त्री भ्रूणहत्या, महिलांवर अन्यायाच्या तसेच दुजाभाव केल्याचा घटना सतत घडत असतात. मात्र आजही मुला-मुलींमध्ये भेदभाव न करणारे पालक समाजात आहेत. असाच अनुभव अकोलेकरांना नुकताच आला. येथील सिंधी कॅम्प परिसरातील व्यापारी ब्रह्मानंद वालेछा यांनी विवाह ठरलेल्या मुलीला हळदीच्या कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी चक्क घोडागाडीतून मिरवणूक काढली. या वेळी मिरणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी ठेका धरला. ब्रह्मानंद वालेछा यांना दोन मुली आहेत. रुबल नावाच्या मुलीचा िववाह अहमदाबाद येथे २१ नोव्हेंबरला होत आहे. अकोल्यात नुकतीच रीतिरिवाजाप्रमाणे हळदीसह इतर कार्यक्रम झाले.
बातम्या आणखी आहेत...