आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील बोलल्याच्या रागातून मुलाची विहिरीत ऊडी घेऊन अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 अकोला:  दुकानाकडे लक्ष देत जा, असे 17 वर्षीय मुलाला वडीलांनी म्हटले. त्यांच्या बोलण्याचा राग आल्याने मुलाने घरून निघून जाऊन घराशेजारी असलेल्या विहिरीत बुधवारी रात्री उडी घेतली. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बिर्ला कॉलनीजवळ राममंदिराच्या जवळ घडली असून, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 
 
गौरव बाबुसिंग पवार (वय 17) असे मृतक युवकाचे नाव अाहे. गौरवने यंदा 10 ची परीक्षा दिली आहे. वडिलांचे सायकलचे दुकान असल्याने तो आणि त्यांचा 19 वर्षीय मोठा भाऊ रोहन वडिलांना दुकानात हातभार लावत असतात. नेहमीप्रमाणे दोघेही दुकानात जात असतात. मात्र बुधवारी रोहनची तब्येत बरी नसल्याने तो दुकानात गेला नाही. तर गौरव दुकानात गेला होता. रात्री 9 वाजता वडिलांसोबतच तो घरी आला होता. यावेळी जेवण झाल्यानंतर वडिलांनी गौरवला दुकानात तू लक्ष देत जा, असे म्हटले. वडिलांच्या बोलण्याचा गौरवला राग आला.
 
रात्री 10वाजतानंतर गौरव घरी आल्याने सर्व काळजीत पडले. त्यानंतर त्यांनी त्याचा शोध सुरु केला. सकाळी पाच वाजेपर्यंत आई-वडिल भाऊ रोहन त्याचा शोध घेतच होते. तेवढ्यात त्यांना बिर्ला कंपनी कंपाऊंडमधील विहिरीच्या बाजूला त्याची चप्पल, सायकल मोबाइल पडलेला दिसून आला. त्यांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता मृतदेह दिसून आला. 
बातम्या आणखी आहेत...