आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुण्‍या शहरावर ‘अंधार’, वीजपुरवठा हाेताे सातत्याने खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जुनेशहराच्या अनेक भागांत २६ तास लोटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर दुसरीकडे संपूर्ण रात्र अंधाराचा सामना करावा लागला.
सप्टेंबरला सायंकाळी पावसाने जोरदार एंट्री केली. पावसासोबतच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. जुने शहरातील रेणुकानगर, वानखडेनगर, संत गोरोबा काका मंदिर परिसर, गजानननगर, लक्ष्मीनगर, आश्रयनगर, मेहरेनगर, भवानीनगर, सोपीनाथनगर, अयोध्यानगर, चिंतामणीनगर, गोडबोले प्लॉट, मारुतीनगर, शिवसेना वसाहत, अनंतनगर, भारती प्लॉट, फडकेनगर, ज्ञानेश्वरनगर, जोगळेकर प्लॉट, गणेशनगर, इंदिरा कॉलनी आदी भागातील वीजपुरवठा सायंकाळी सहा वाजता खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. परंतु, बिघाड दुरुस्त केल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार सुरू होते. सप्टेंबरला पहाटे साडेतीन वाजता अनेक भागातील वीजपुरवठा सुरू झाला. परंतु, पुन्हा १५ मिनिटांनी खंडित झाला. खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी वाजता पुन्हा सुरू झाला. परंतु, पुन्हा बिघाड झाल्याने ९.३० वाजता खंडित झाला. २० तासांपेक्षा अधिक काळ वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाने दांडी मारल्याने तसेच वातावरणात उकाडा असल्याने हजारो नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अद्यापही काही भागातील वीजपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

अधिकाऱ्यांमध्येएकमत नाही : विद्युतपुरवठा खंडीत होण्या मागचे मुख्य कारण काय? याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्येही उर्वरित.पान
एकमतनव्हते. ज्युनिअर इंजिनिअरच्या मते वीज कोसळल्यामुळे अथवा विजेच्या गडगडामुळे डिस्क पंक्चर झाल्यामुळे हा प्रकार घडला, तर काहींच्या मते अंडर ग्राउंड केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या प्रकारामुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्या मागचे नेमके कारण काय? याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
पाण्यासाठीभटकंती : अनेकनागरिकांकडे बोअर आहेत. त्यावर जेट पंप किंवा सबमर्सिबल पंप बसवले आहेत. २० तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने छतावरील पाण्याच्या टाक्या ठणठण झाल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली.

प्रयत्नव्यर्थ : महावितरणचेकर्मचारी झालेला तांत्रिक बिघाड शोधण्याचे काम युद्धपातळीवर करत होते. पहाटे साडेतीनपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्मचाऱ्यांनी पावसात, रात्र जागून काढून केलेला प्रयत्न अखेर व्यर्थ ठरला. सप्टेंबरला दुपारी पर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता.
संतापाचीलाट : दिवस-रात्रविद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. असा कोणता तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे, जो दुरुस्त होऊ शकत नाही? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणप्रति संतापाची लाट पसरली आहे.
व्यवसायावरपरिणाम : आजविविध व्यवसायात वीज महत्त्वाचा घटक आहे. २० तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने दूध, दही विक्रेते, उपाहारगृहे, रेस्टॉरंट, फळ िवक्रेत्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला, तर अनेकांनी मंगळवारच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी सोमवारी पिठाच्या गिरणीत दळणे ठेवली होती. परंतु, वीजपुरवठा खंडित झाल्याने पिठाच्या गिरण्या सुरूच झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांनी शेजारच्याकडून उसनवारीने पीठ घेऊन भोजनाची व्यवस्था केली, तर कपडे इस्त्री करणाऱ्यांचा व्यवसायही ठप्प झाला आहे.
तासांपेक्षा अधिक काळ वीज नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत अाहे.

नागरिकांचा मोर्चा
विद्युतपुरवठा पूर्ववत झाल्याने संतप्त झालेल्या जुने शहरातील गजानननगर भागातील नागरिकांनी अखेर सांयकाळी सब स्टेशनवर मोर्चा काढला. रात्रीच्या वेळी बिघाड समजला नाही. मात्र आज दिवसभरातही बिघाड शोधण्यात महावितरणला अपयश का आले ? याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करून कस्तुरबा गांधी रुग्णालयाजवळील सब स्टेशनसमोर नागरिकांनी निदर्शने केली.

‘ब्रेक डाऊन’ काय?
विविधभागातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मोबाइलद्वारे विद्युत पुरवठा केव्हा सुरू होणार? याबाबत माहिती विचारली. महावितरणचे अधिकारी तसेच कर्मचारी ब्रेक डाऊन झाले आहे, अशी माहिती देत होते. परंतु, ब्रेक डाऊन होणे म्हणजे नेमके काय? याबाबत नक्की माहिती नागरिकांना नसल्याने अनेकांनी ब्रेक डाऊन म्हणजे काय हो? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
इन्व्हर्टरही निकामी
भारनियमनामुळेअनेक नागरिकांनी इन्व्हर्टर लावले आहेत. परंतु, दिवस-रात्र वीजपुरवठा खंडित राहिल्याने हजारो रुपये खर्च करून खरेदी केलेले इन्व्हर्टरही निकामी ठरले आहेत. अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली.

भारनियमनाचा रेकाॅर्ड
नागरिकांनीते तासांच्या भारनियमनाचा अनुभव घेतला आहे. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे २६ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला, असा अनुभव अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अातापर्यंतच्या भारनियमनाचा रेकाॅर्ड ब्रेक झाला अाहे.
नेमके झाले काय?
बिघाडाला२६ तासांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे. झालेला बिघाड शोधूनही सापडत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे नेमके कोणते कारण आहे? इतर सब-स्टेशनवर अथवा फीडरवर असा प्रकार कधीही झाला नाही? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
चौैकशी करावी
^अद्यापही अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हा बिघाड नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला? याची चौकशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करावी.'' विलासशेळके, माजी सभापती, महापालिका अकोला.

ग्राउंड केबलमुळे बिघाड
^अंडरग्राउंड केबलमध्ये बिघाड झाल्याने नेमका कुठे बिघाड झाला आहे? याचा शोध घेण्यास विलंब झाला. परंतु, शोध घेणे सुरू असून, अनेक भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला, तर उर्वरित भागातील वीज पुरवठा लवकरच सुरू होईल.'' चंद्रकांतदामसे, कार्यकारी अभियंता, महावितरण