आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांची घरपोच सेवा, तयार केला व्‍हॉट्सअॅप गृप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काेणत्याही प्रकारच्या तक्रारी अाणि गाऱ्हाण्यांसाठी अाता ज्येष्ठ नागरिकांना तास न् तास पाेलिस ठाण्यात बसण्याची अावश्यकता नाही. जेष्ठ नागरिक अाणि पाेलिसांचा एक व्हाॅट्सअॅप ग्रृप तयार करण्यात अाला अाहे. जेष्ठांच्या तक्रारी पाेलिस त्यांच्या घरी जाऊन एेकणार अाहेत. राज्यात अकाेल्यातील पाेलिस पहिल्यांदाच असा उपक्रम राबवत अाहे, हे विशेष.
 
ज्येष्ठांना काेणत्याही कामासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारण्याचे काम पडू नये म्हणून खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके यांनी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पासपोर्ट, व्हेरीफिकेशन, चारित्र पळताळणी , छोट्या मोठ्या तक्रारी सोडवण्यासाठी पोलिसच ज्येष्ठांची वेळ घेऊन त्यांच्या घरी जाणार असून त्यांची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. त्यासाठी पोलिस परिसरातील ज्येष्ठांच्या संघटनांची माहिती घेत असून व्हॉटसअॅप ग्रुप तयार करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु अाहे.
 
व्हॉट्सअॅपचा आधार : ठाणेदार गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक शशिकिरण नावकर, कॉन्स्टेबल किशोर सोनोने, किशोर आठवले, प्रसाद सोगासने हे ज्येष्ठांच्या सर्व व्हॉट्रसअप ग्रुपमध्ये राहणार आहेत. त्याद्धारे विविध योजना, कायदे आवश्यक माहितीचे आदानप्रदान हाेणार अाहे. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून समस्या तक्रारी सोडवणार आहेत.
 
सुरक्षा अग्रस्थानी
ज्येष्ठांना उतारवयात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारलेले ज्येष्ठ मी अनुभवले आहेत. त्यांची सोय व्हावी, त्यांना वारंवार पोलिस ठाण्यात चकरा माराव्या लागू नयेत, या उदात्त हेतून हा उपक्रम सुरु केला आहे.
- गजानन शेळके, ठाणेदार खदान
बातम्या आणखी आहेत...