आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूल, रस्ता नसल्याने गमावावी लागते शाळा; जिल्हा कचेरीसमोर विद्यार्थी, नागरिकांचे उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पूल रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी मांजरी येथील विद्यार्थी नागरिकांनी जिल्हाकचेरीसमोर उपोषण सुरु केले आहे. या अडचणीमुळे पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांना आठ-आठ दिवस घरीच बसून रहावे लागते, अशी उपोषणकर्त्यांची खंत आहे. 

त्यांच्या मागणीनुसार मांजरी ते बादलापूर हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे नागरिकांना चालताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गावात शाळा दवाखान्याची पुरेशी सोय नसल्यामुळे तेथील नागरिकांना अकोल्यात ये-जा करावी लागते. परंतु रस्ता खराब असल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. या रस्त्यातच एक नाला आहे. या नाल्याला पूर आला की दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाल्याकाठीच थांबावे लागते. कधी-कधी तर शाळेतून परतताना रात्रभर नाल्याकाठीच थांबावे लागले, असेही प्रसंग त्यांच्यावर ओढवले आहेत. एकदा तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतपेट्याही गावातच ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे निकाल विलंबाने घोिषत केला गेला. परंतु एवढे होऊनही या गावचा ना रस्ता सुरळीत केला गेला ना पूल तयार झाला, ही उपोषणकर्त्यांची खंत आहे. 

स्वातंत्र्य आमच्यासाठी नाही का ? 
उपोषणास बसलेल्या विद्यार्थी, नागरिकांनी दुपारनंतर जिल्हािधकाऱ्यांना एक निवेदन सोपविले. यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहाराचा त्यामध्ये उल्लेख आहे. शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असतानाही आम्हाला मुलभूत सोईंसाठी झगडावे लागते, हा खेदजनक मुद्दा पुढे करुन स्वातंत्र्य आमच्यासाठी नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.