आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्लॅब टाकण्याचा निर्णय, पण काम रखडलेलेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला पाणीपुरवठा योजनेच्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सम्पवर (विहीर) अखेर स्लॅब टाकण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. यापूर्वी सम्पवर स्लॅब टाकण्याचा अफलातून निर्णय पाणीपुरवठा विभागानेच घेतला होता. विशेष म्हणजे या सम्पवर शुद्ध केलेल्या पाण्याचा साठा केला जातो.

महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सहा पंप सहा मोटर्स खरेदीसह ट्रान्सफार्मर दुरुस्ती तसेच सम्प दुरुस्तीचे कामही घेण्यात आले होते. पंप मोटर्स शुद्धीकरण केंद्रात दाखल झाले असून, ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर सम्प दुरुस्तीचे काम अर्धवट राहिले आहे. सम्पवरील जुना स्लॅब काढल्यानंतर यावर पुन्हा स्लॅब टाकायचा की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. एका अधिकाऱ्याच्या मते स्लॅब टाकण्याची काहीही गरज नाही, केवळ सुरक्षिततेच्या हेतूने फेन्सिंग करा, त्यामुळे पैसाही वाचेल. परंतु, या सम्प (विहीर) मध्ये शुद्ध केलेले पाणी साठवले जाते. हेच पाणी पंप केले जाते, त्यामुळे सम्प उघडी राहिल्यास त्यात पक्षी पडण्याची तसेच हवेमुळे कचरा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलशुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च करूनही नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर स्लॅब टाकावा, असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे स्लॅब टाकण्याचे काम रखडले आहे. हे प्रकरण आयुक्तांसमोरही गेले, परंतु स्लॅब नसलेले सम्पही अनेक ठिकाणी आहेत, अशी धादांत खोटी माहिती आयुक्तांना पुरवण्यात आली. परंतु, अखेर यावर स्लॅब टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

त्यातकाय? फाऊंटेनही खुलेच असते : सम्पवरस्लॅब टाकण्याची गरज नाही, हे म्हणणे खरे करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रातील फाऊंटेनवर कुठे स्लॅब असतो. फाऊंटेनही खुलेच असते. त्यातही पक्षी पडू शकतात, असे आश्चर्यकारक मत कार्यकारी अभियंत्यांनी आयुक्तांकडे मांडले. परंतु, फाउंटेनमुळेच पाणी आदळले जाते आणि त्यामुळे पाण्यातील गॅस असलेले बबल्स फुटतात हा गॅस हवेत जातो. त्यामुळे त्यावर स्लॅबच टाकता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फाऊंटेनमध्ये रॉ वॉटर असते तर सम्पमध्ये शुद्ध केलेले, याचा विसरही कार्यकारी अभियंत्यांना पडल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.