अकोला - गृहकर्ज मंजूर करण्यासाठी घेतलेले लाचेचे १० हजार रुपये ‘गिळण्या’चा प्रताप जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी सोमवारी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच इनामदार यांना अक्षरश: उलटे केले आणि तोंडातून नोटा बाहेर काढत त्यांची बेइमानी उघड केली. विशेष म्हणजे सोमवारीच राज्याच्या मुख्य सचिवांनी लाचेच्या प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला होता.
तेल्हारा पंचायत समितीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या एकूण ११ लाख २२ हजारांच्या गृहकर्जाची फाइल जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी गेली होती. त्यासाठी इनामदार यांनी २५ हजारांची लाच मागितली. आधी १५ हजार मिळाले. उर्वरित १० हजार रुपये घेताना इनामदार यांना अटक झाली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी इनामदार यांना स्वत:ची ओळख करून देताच त्यांनी पैसे गिळण्याचा प्रयत्न केला. पाचशेच्या नोटांच्या बंडलला पिना लावलेल्या असल्याने बंडल त्यांच्या तोंडात फसले. शेवटी त्यांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांच्या घशात अडकले. अखेर अधिकाऱ्यांनी इनामदारांच्या पाठीत आधी बुक्के मारले आणि नंतर उलटे केले. अखेर ठसका लागून बंडल बाहेर पडले.
पुढे वाचा.. उलटे टांगून पाठीत बुक्क्या...नोटा बाहेर