आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांकडून ताेडफाेड, दारुड्या सदस्याला बसवले अकाेल्यात ‘अध्यक्ष’पदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुपारी एक वाजता सुरू हाेणाऱ्या सभेला चार वाजेपर्यंतही अध्यक्ष न अाल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी नशेत असलेल्या एका सदस्यालाच थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले. त्यानंतर नशेत ‘टुल्ल’ असलेल्या या सदस्याने सभेसाठी सचिव न मिळाल्याच्या कारणावरून थेट सभागृहातच ताेडफाेड सुरू केली. या गाेंधळात एक महिला सदस्य जखमी झाली. अकाेला जिल्हा परिषदेच्या सभेत शुक्रवारी हा तमाशा बघायला मिळाला.
सर्वसाधारण सभेत जमलेले सर्व सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांची तीन तास वाट पाहत बसले हाेते. तेवढ्यात शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे यांनी आपल्यातील एकाने अध्यक्ष व्हावे, असे सुचवले. दुसऱ्याने त्याला अनुमोदनही दिले. त्यानंतर नशेत ‘टुल्ल’ असलेले राजेश खोने यांना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवण्यात अाले. दुर्दैव म्हणजे या मद्यपी ‘ध्यक्षां’साेबत शुद्धीत असलेल्या सदस्यांनीही जिल्ह्याच्या विकासकामांवर गमतीगमतीत दाेन तास चर्चा केली. त्यानंतर मुद्दा उपस्थित झाला तो सचिवाचा. सचिव उपस्थित नसल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी हे सचिव होतील, अशी सूचना खोने यांनी केली. ‘तुम्ही ऐकत नसाल तर विभागीय चौकशी नेमण्यात येईल,’ असा दमही खाेनेंनी कुळकर्णींना भरला. मात्र, कुळकर्णींनी नकार दिल्याने सदस्य संतापले. नितीन देशमुख यांनी आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींचा हा अपमान असल्याचे सांगत माइक आपटून खुर्च्या फेकल्या. महादेव गवळे यांनीही खुर्च्या, टेबलची तोडफोड केली. दरम्यान, या प्रकाराने धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून पळ काढला व कामकाजावर बहिष्कार टाकला. सीईअाेंनी त्यांना धीर दिला.