आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती मोर्चात सहभागासाठी अकोलेकर मुबंईकडे रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - काेपर्डीतील अत्याचार हत्येचा निषेध करण्यासह इतरही मागण्यांसाठी मुंबईत क्रांतीदिन, 9 अाॅगस्ट रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती माेर्चात सहभागी हाेण्यासाठी मंगळवारी अकाेल्यातील समाजबांधव मुबंईकडे रवाना झाले. 
 
जिल्ह्यातील मराठा समाजबांधव मागील दोन दिवसांपासूनच मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी शालीमार एक्सप्रेस, मेल, अमरावती मुंबई, विदर्भ एक्सप्रेसने माेठ्या संख्येने मराठा समाजबांधव रवाना झाले. हा मुक मोर्चा असल्याने कोणत्याही प्रकारचा गोंधळ रेल्वेस्थानकावर दिसून आला नाही. शिस्तबद्ध पद्धतीने मराठा समाजबांधव मुंबईकडे रवाना झाले. काहींनी खासगी बसेसही भाडे तत्वावर घेतल्या हाेत्या. अनेक जण तर चार चाकी वाहने घेऊन निघाले. 
 
असा निघेल माेर्चा 
मुबंईत सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मराठा मोर्चास सुरुवात हाेणार अाहे. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे.जे.उड्डाणमार्गे छत्रपती शिवाजी टर्मीनस ओलांडून आझाद मैदानावर माेर्चाचा समाराेप होणार आहे. 
 
ठिकठिकाणी स्वागत 
मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांचे विविध सामाजिक संघटनांनी स्वागत करत त्यांना नाश्ता, चहा जेवणाचे पाकीट वितरीत केले. तत्पूर्वी अाॅगस्ट राेजी नाेंदणी करण्याचे अावाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात अाले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...