आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट फैल पोलिस ठाणे विभागातील ‘स्मार्ट पोलिस ठाणे’!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पोलिस ठाणे म्हटले की आजही भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. सतत गडबड, वॉकी टॉकीचा आवाज, आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याशी पोलिसांचा व्यवहार असा दरारावजा परिसर समोर येतो. मात्र त्याला अकोट फैल पोलिस ठाणे अपवाद आहे. आज हे पोलिस ठाणे विभागातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून नावारूपाला येत आहे.केंद्रीय स्तरावर नुकताच राजस्थान मॉडेलचा अभ्यास करून पोलिस ठाणे कसे अद्ययावत सुसज्ज असावे? यासाठी ‘स्मार्ट पोलिस ठाणे’ ही संकल्पना राबवली जात आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांना स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्याचा निर्धार केला आहे. अकोला शहरातील तीन पोलिस ठाण्यांची त्यासाठी निवड केली आहे. सिव्हिल लाइन्स, खदान अकोट फैल पोलिस ठाण्यांचा त्यात समावेश आहे. तीनही पोलिस ठाण्यांना स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्यावर येथील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ओढ दिसून येत आहे. त्यातही अकोट फैल पोलिस ठाण्याने स्मार्ट पोलिस ठाण्याच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. चकाचक, प्रशस्त वेटिंग रुम, पोलिसांचा तक्रारदारांप्रती व्यवहार, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, वृक्षारोपण, रंगरंगोटी करून स्मार्ट पोलिस ठाण्यांसाठीच्या नियमावलीची पूर्तता करण्यात येत आहे. या पोलिस ठाण्याचा प्रभार तिरुपती राणे यांनी स्वीकारल्यापासून येथील पोलिस ठाण्याने कात टाकली असून, या ठाण्याने आदर्श निर्माण केला आहे. 
 
आकोट फैल पोलिस ठाण्याचे रुपच पालटले 
पोलिस ठाण्यात अभ्यागत कक्ष, स्टेशन डायरी, ड्युटी मदतगार, महिला विश्रामगृह, लेखनिक कक्ष, पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण आदी बाबींचे निर्माण करण्यात आले आहे वरिष्ठांच्या ठाणेदार तिरुपती राणे विभागातील एक नंबरचे स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्याचा प्रयत्न 
^पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्यांसोबत पोलिसांकडून चांगला व्यवहार करण्यात येतो. प्रत्येकाची तक्रार घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येतो. वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्याचा प्रयत्न करतआहो.’’ तिरुपती राणे, ठाणेदार अकोट फैल पोलिस 
 
बातम्या आणखी आहेत...